Video | हवामान खात्याचा अंदाज सांगत होती महिला पत्रकार, मध्येच कुत्रा आला अन् भलतंच घडलं, एकदा व्हिडीओ पाहाच

रशियातील एका महिला पत्रकारासोबत एक मजेदार किस्सा झाला आहे. लाईव्ह रिपोर्टींग करताना महिला पत्रकाराची चांगलीच फजिती उडालीये. (dog snatches mike from journalist viral video)

Video | हवामान खात्याचा अंदाज सांगत होती महिला पत्रकार, मध्येच कुत्रा आला अन् भलतंच घडलं, एकदा व्हिडीओ पाहाच
महिला पत्रकाराचे बूम माईक कुत्र्याने अशा प्रकारे हिसकावून घेतले.
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 6:46 PM

मॉस्को : पत्रकार जनसामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी 24 तास कर्तव्यावर असतात. नेहमीच तत्पर असलेल्या पत्रकांविषयी अनेकांच्या मनात आदराचं स्थान असतं. मात्र, कधीकधी पत्रकारांसोबत घडलेले प्रसंग किंवा रिपोर्टींग करताना पत्रकाराने केलेली कृती पाहून आपल्याला चांगलंच हसू फुटतं. असाच एक मजेदार किस्सा रशियातील एका महिला पत्रकारासोबत झाला आहे. लाईव्ह रिपोर्टिंग करताना महिला पत्रकाराची चांगलीच फजिती उडालीये. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. (dog interrupt and snatches mike for women Journalist in Russia Moscow)

महिला पत्रकार हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी उभी

मिळालेल्या माहितीनुसार रशियातील एका न्यूज चॅनेलमध्ये हवामानाचा अंदाज सांगितला जात होता. यावेळी मॉस्को शहरात सध्या वातावरण कसं आहे, हे सांगण्यासाठी मॉस्कोमधील स्थानिक महिला पत्रकार Nadezhda Serezhkina या लाईव्ह रिपोर्टिंग करत होत्या. रिपोर्टींगमध्ये मॉस्कोमधील हवामान नेमकं कस आहे, याबद्दल त्या सांगत होत्या.

अचानक कुत्रा आला

लाईव्ह रिपोर्टीगं सुरु असताना Nadezhda Serezhkina यांच्यासमोर लॅब्राडोर रिट्रीव्हर जातीचा एक कुत्रा आला. या कुत्र्याने महिला पत्रकाराच्या हातातील बुम माईकवर झेप घेऊन पत्रकारजवळचे माईक हिसकाऊन घेतले. बेसावध असल्यामुळे सुरुवातीला या महिला पत्रकार थोड्या गोंधळल्या. त्यानंतर आपल्याकडचे माईक कुत्र्याने हिसकाऊन घेतल्याचे समजताच या महिला पत्रकाराने कुत्र्याचा पाठलाग करणे सुरु केले.

पाहा व्हिडीओ :

हा सर्व प्रकार घडत असताना न्यूज चॅनेलच्या कॅमेरामॅनने कॅमेरा सुरुच ठेवला होता. मॉस्कोमध्ये थांबलेल्या महिला पत्रकारासोबत हा प्रकार घडल्यानंतर न्यूजरुममधील अँकरने पत्रकाराशी संपर्क तुटल्याचे सांगत वेळ मारून नेली. मात्र, लाईव्ह रिपोर्टीगं होत असल्यामुळे मॉस्कोतील पत्रकाराची फजिती सर्वांनीच पाहिली. त्यानंतर हा व्हिडीओ काही क्षणांत व्यायरल झाला.

दरम्यान, वार्तांकन करताना रिपोर्टरची धांदल उडणे ही काही पहिलीच घटना नाही. या आधीसुद्धा लाईव्ह रिपोर्टींग करताना न्यूज अँकर रिपोर्टर्स अचानक समोर आलेल्या प्रसंगामुळे भांभावलेले आहेत. मात्र हा व्हिडीओ अगदीच सहज आणि नैसर्गिक असल्यामुळे नेटकऱ्यांनी या त्याला चांगलीच पसंती दिली आहे.

इतर बातम्या :

VIDEO: भर रस्त्यावर मुंगूस-नागाच्या तुंबळ लढाईचा थरार, झुंज पाहण्यासाठी रस्त्यावरची वाहतूकही थांबली

VIDEO : कराडमध्ये माथेफिरु ओव्हरहेड वायरवर चढला

VIDEO | तरुणीनं ब्रेक समजून एक्सीलेटर फिरवलं, स्कुटी घेऊन पडताच लोक म्हणाले “पापा की परी, रोड पर पड़ी”

(dog interrupt and snatches mike for women Journalist in Russia Moscow)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.