VIDEO| तेलंगणामध्ये दारूच्या नशेत एक व्यक्ती होर्डिंगला लटकला, पाहा व्हायरल व्हिडीओ
VIDEO| दारूच्या नशेत एकजण होर्डिंगला लटकला, रस्त्यात केलं ट्रॅफिक जाम, मग पोलिसांनी...
तेलंगणा – राज्यात एक व्हिडीओ (VIDEO) सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओला पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तो इसम तिथ कसा पोहोचला असा अनेकांनी प्रश्न विचारला आहे. ज्यावेळी पोलिसांनी (police) त्याला खाली उतरवलं, त्यावेळी तो दारुच्या नशेत असल्याचं सांगितलं. सिद्धिपेट परिसरात हा गोंधळ झाला आहे. व्हायरल व्हिडीओत त्याला कसा उतरवण्यात आला, हे सुध्दा पाहण्यासारखं आहे. ज्या व्यक्तीने हा गोंधळ घातला, त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं व्हिडीओ काय आहे
रस्त्यात एक होर्डींग आहे, त्याला दारु पिलेला एकजण लटकलेला दिसतोय. तो जोरात ओरडत आहे. त्यामुळे तिथली लोकं एका जागी जमली आहेत. काही मिनिटं तो तसाचं लटकलेला आहे. त्यानंतर तिथं एक पिवळ्या रंगाची बस लावली जाते. एका बाजूने दोर टाकून लोकं आणि पोलिस त्याला खाली उतरवतात. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
This is the Situation in #Siddipet
Mr.@trsharish Do you have an Answer?@BRSparty #KCRFailedTelangana pic.twitter.com/u5yzfRv5FD
— Maruthi (@Maruthi0305) January 11, 2023