Anand Mahindra tweet : बैलांच्या कळपावर ‘हा’ एकटा बदक भारी! पाहा, Ultra high josh..!
Duck fights with bulls video : एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये एकटे बदक बैलांच्या कळपाचा घाम काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या ट्विटरवरून शेअर केला आहे.
Duck fights with bulls video : सोशल मीडियावर अनेकवेळा असे फोटो आणि व्हिडिओ समोर येतात, जे पाहून आश्चर्य वाटते आणि हे खरेच घडले आहे का, असा प्रश्न पडतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये एकटे बदक बैलांच्या कळपाचा घाम काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी प्रेरणा कशी असावी, हे सांगितले आहे. हा व्हिडिओ सुमारे 7 लाख वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, ट्विटर यूझर्स यावर सतत त्यांच्या कमेंट्स नोंदवत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक बदक एकटे बैल आणि गायींच्या कळपाशी लढत आहे. बैल आणि गायींनी बदकाला चारही बाजूंनी घेरले आहे आणि त्यापैकी एक-दोन बदकाला मारण्याचा प्रयत्नही करतात. मात्र या बदकाच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल.
चोचीने बैलांवर हल्ला
बैलांपेक्षा अनेक पटींनी लहान असूनही बदक त्यांना जुमानत नाही आणि तिथेच राहते. यानंतर ते आपल्या चोचीने बैलांवर हल्ला करते. हे पाहून बैल खूप अस्वस्थ होतात आणि बदकांसमोर येण्यापासून दूर जातात. बदकाचा उत्साह पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व सोशल मीडियावर सक्रिय असले तरी काही भारतीय उद्योगपती आहेत जे त्यांच्या फॉलोअर्समध्ये त्यांच्या मनोरंजक आणि सर्जनशील पोस्टसाठी ओळखले जातात. उद्योगपती आनंद महिंद्रा हे त्यापैकीच एक.
‘How’s the Josh, bird?’
विकी कौशल स्टारर चित्रपट उरीचा प्रसिद्ध संवाद असलेला व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘How’s the Josh, bird?’ ‘High sir, Ultra high’. यासोबतच त्यांनी लिहिले आहे, की या पक्ष्याचा उत्साह. त्याची प्रेरणा आहे.
सोशल मीडियावर सक्रिय
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. जेव्हा तो एखादी पोस्ट शेअर करतात, तेव्हा ती व्हायरल होते. त्यांचे फॉलोअर्सही मजेशीर पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवतात. यामुळेच उद्योगपती महिंद्रा यांच्या प्रत्येक पोस्टला लोकांना पसंती मिळते.
‘How’s the Josh, bird?’ ‘High sir, Ultra high’. That bird’s chutzpah is my #MondayMotivation (courtesy @ErikSolheim ) pic.twitter.com/lVDRXpDZbp
— anand mahindra (@anandmahindra) February 21, 2022