Video : विश्वास ठेवा ही आलिया भट नाही!, ‘ड्युप्लिकेट आलिया’चा सोशल मीडियावर धुमाकूळ…
celesti.bairagey नावाच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ही मुलगी 'दिल तो पागल है' चित्रपटातील अब तो कुछ है बोलना या गाण्यावर नाचताना आणि लिपसिंक करताना दिसत आहे.
मुंबई : आलिया भट अनेक तरूणांच्या हृदयाची धकधक… तिला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. तिच्या एका फोटो- व्हीडिओला लाखो लोक लाईक करतात. पण आज आम्ही तुम्हाला आलियाच्या डुप्लिकेट कॉपीबद्दल सांगणार आहोत. या मुलीच्या व्हीडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या मुलीचा लूक सेम टू सेम आलिया भट्टसारखा वाटतोय. तिची स्टाईल पाहून लोक तिच्या अदांवर फिदा झालेत. तिला पाहिलं की आपण आलियालाच पाहत आहोत असा फिल येतो. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हीडिओने एकच खळबळ उडवून दिली आहे.
व्हायरल व्हीडिओ
आज आम्ही तुम्हाला आलियाच्या डुप्लिकेट कॉपीबद्दल सांगणार आहोत. या मुलीच्या व्हीडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या मुलीचा लूक सेम टू सेम आलिया भट्टसारखा वाटतोय. तिची स्टाईल पाहून लोक तिच्या अदांवर फिदा झालेत. तिला पाहिलं की आपण आलियालाच पाहत आहोत असा फिल येतो. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हीडिओने एकच खळबळ उडवून दिली आहे. या मुलीने ‘गंगूबाई काठियावाडी’मधल्या आलिया भट्टच्या लूकसारखा लूक केलाय. त्यामुळे तिची जोरदार चर्चा आहे.
View this post on Instagram
दरम्यान ही मुलगी कोण आहे, तिचं नाव काय आहे, याविषयी अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण तिचा हा व्हीडिओ व्हायरल होतोय हे मात्र नक्की…
celesti.bairagey नावाच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ही मुलगी ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील अब तो कुछ है बोलना या गाण्यावर नाचताना आणि लिपसिंक करताना दिसत आहे. व्हायरल व्हीडिओमध्ये या मुलीने पांढऱ्या रंगाची ऑर्गेन्झा साडी नेसली आहे आणि तिच्या केसांच्या बटा तिच्या चेहऱ्यावर येत आहेत. त्यामुळे तिचा लूक पूर्णपणे आलियासारखा दिसत आहे. त्याचसोबत तिने गॉगल आणि कानातलं घातलं आहे.
View this post on Instagram
या मुलीची स्माईलही आलिया भटशी मिळतीजुळती आहे. तिच्या गालावरचे डिंपल्स, तिचा रंग आलिया भट्टसारखाच आहे. त्यामुळे अनेकांना ही आलियाच असल्याचा भास होतोय. तिचा हा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ 60 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तर साडे तीन लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय.