VIDEO | प्रवासादरम्यान महिलेने रिक्षा चालकाचे अप्रतिम चित्र काढले, त्यानंतर चालकाचा चेहरा पाहण्यासारखा
Viral Video : प्रवास करीत असताना एका महिलेने मागे बसून रिक्षा चालकाचे चित्र काढले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर लोकांनी महिलेचं कौतुकं केलं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ १३ लाख लोकांनी पाहिला आहे.
मुंबई : जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यासाठी एखादं चांगलं काम करते. त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर नक्की आनंद पाहायला मिळतो. सध्या त्याच पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Trending Auto Rikshaw Driver Sketch) झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका महिलेने रिक्षातून (Rikshaw) प्रवास करीत असताना एक चित्र तयार केलं आहे. विशेष म्हणजे मागे बसून जलद गतीने चित्र काढलं आहे. ज्यावेळी रिक्षा चालकाला (Driver Sketch) त्या महिलेने हे चित्र दाखवलं त्यावेळी चालकाच्या चेहऱ्यावर एक वेगळचं हास्य दिसलं, अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्याचबरोबर लोकांना आवडतात सुध्दा असं अनेकदा पाहायला मिळालं आहे.
चालक सुध्दा अधिक खूश झाला
महिला त्या रिक्षातून फक्त तीन मनिटाचा प्रवास केला आहे. त्याचबरोबर त्या महिलेने अगदी सुपर फास्ट पद्धतीने चित्र काढले आहे. चित्र पाहण्यासारखे आहे. त्या महिलेने इतक्या फास्ट चित्र काढल्यानंतर रिक्षा चालक सुध्दा अधिक खूश झाला आहे, त्याचबरोबर सोशल मीडियावर असणारे नेटकरी सुध्दा अधिक खूष झाले आहेत. लोकांनी महिलेकडे असलेल्या कौशल्याची चांगलीचं तारिफ केली आहे. त्यासाठी तुम्ही व्हायरल व्हिडीओ पाहा.
View this post on Instagram
व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला
हा व्हिडीओ आर्टिस्ट दीक्षा यांनी 10 एप्रिलला आपल्या इंस्टाग्राम अकाउंट @artcartbydiksha वरती शेअर केला आहे. आतापर्यंत १३ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ फक्त तीन मिनिटाचा आहे. छोट्याशा प्रवासात महिलेने अशा पद्धतीने स्केच तयार केल्यामुळे लोकांनी त्या महिलेचं कौतुक केलं आहे. तुम्हाला सुध्दा हा व्हिडीओ आवडला तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आलेल्या कमेंटवरुन हा व्हिडीओ किती व्हायरल झाला आहे याचा अंदाज येतोय.