Video | कधी पाहिला नाही असा प्रकार, या बिचवर दिसला ‘शैतान’, दुकाने बंद करुन पळाले लोक, पाहा व्हिडीओ
रात्री समुद्राची गाज ऐकत सर्वजण मजा लुटत होते. अचानक हवेतून धुळीचे लोट उडाले. अचानक घडलेल्या या प्रकाराने दुकानदार दुकाने बंद करुन पळाले.
चेन्नई | 18 ऑक्टोबर 2023 : समुद्राची खारं वारं खाण्यासाठी बिचवर लोक जमले होते. रात्रीची वेळ होती आणि अचानक वावटळ यावी तसा तो आला. लोक त्याचं अक्राळविक्राळ रुप पाहून इतके घाबरले की एकच पळापळ झाली. दुकानदारांनी आपली दुकानं बंद केली. तर लोक आवराआवर करुन घराकडे पळाले. सोमवारी रात्री 10 वाजता हा विचित्र प्रकार घडला आहे. लोकांनी या विचित्र घटनेचा मोबाईलवर व्हिडीओ देखील तयार केला आहे. व्हायरल व्हिडीओ त्याचे भयंकर रुप दिसत आहे. विशेष म्हणजे ही वावटळ संपूर्ण बिचवर न दिसता केवळ एका भागात दिसली. या घटनेनंतर लोक घाबरले आहेत. कुठे घडला हा विचित्र प्रकार पाहा…
तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील मरिना बिचवर सोमवारी रात्री एक विचित्र प्रकार घडला आहे. लोक विचारात पडले की एखादे छोटे चक्रीवादळ समुद्र किनाऱ्यावर धडकू शकते ? त्यानंतर हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले की हा प्रकार नेमका काय आहे ? मरीना समुद्र किनाऱ्यावर ‘डस्ट डेव्हील’ नावाचा नैसर्गिक प्रकार घडला आहे. हवामान तज्ञ्जांच्यामते हे काही चक्रीवादळ नाही. एक नैसर्गिक घटना आहे. यास ‘डस्ट डेव्हील’ म्हटले जाते. असे प्रकार वारंवार घडत असतात. यात नविन काही नाही.
येथे पाहा व्हिडीओ –
Saw This Dust Devil Video circulating in WhatsApp as it happened in #Chennai #Marina beach Yesterday Night pic.twitter.com/sP3oUfhZAD
— MasRainman (@MasRainman) October 17, 2023
‘डस्ट डेव्हील’ एक शक्तीशाली अल्पकालिन चक्रीवादळ आहे. ‘डस्ट डेव्हील’ सामान्यत: हानिकारक नसतात. परंतू काही दुर्मिळ प्रकार संपत्तीलाही नष्ट करु शकतात. ‘डस्ट डेव्हील’ने लोकांना देखील नुकसान झाले आहे. जमिनीजवळील गरम हवेची पोकळी जेव्हा विकसित होते. तेव्हा तिच्यावरील थंड हवेच्या माध्यमाने वेगाने उसळते तेव्हा डस्ट डेव्हील विकसित होते.