Japan Earthquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी जपान (Japan) पुन्हा हादरला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर (Richter scale) 7.3 एवढी होती. जपानच्या ईशान्य किनार्यावरील काही भागांत त्सुनामीचा (Tsunami) इशारा देण्यात आला आहे, यावरून हा भूकंप किती तीव्र होता, याचा अंदाज येतो. एएफपीनुसार, टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीने सांगितले, की भूकंपानंतर सुमारे दोन दशलक्ष घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. या तीव्र भूकंपाचा केंद्रबिंदू फुकुशिमाच्या किनाऱ्यापासून 60 किमी खोलीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नसली, तरी सोशल मीडियावर काही व्हिडिओ नक्कीच व्हायरल होत आहेत, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भीतीदायक असे हे व्हिडिओ असून याआधीच्या शक्तीशाली भूकंपाची आठवण करून देणारे आहेत.
भूकंपाशी संबंधित दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यापैकी एका व्हिडिओमध्ये मेट्रो किती जोरात हादरत आहे, हे दिसत आहे. एका व्यक्तीने मेट्रोच्या आतून एक व्हिडिओ शूट केला आहे, ज्याचे दृश्य भयानक असेच आहे. अवघ्या 14 सेकंदांच्या या व्हिडिओला अवघ्या एका तासात 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय, व्हायरल होत असलेल्या भूकंपाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला असलेले खांब वेगाने हलताना दिसत आहेत. 44 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 61 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
⭕ ⚠️? A Powerful 7.3 magnitude #earthquake hits north #Japan, #tsunami alert issued#Fukushima
Wed Mar 16 2022
? ? ? ? ? ? ℭ????????? | ???? ???? pic.twitter.com/j8P6HS0roC
— ♆ABYSS ℭ ? ? ? ? ? ? ? ? ? (@AbyssChronicles) March 16, 2022
जपानमध्ये एवढा जोरदार भूकंप होण्याची ही पहिली किंवा दुसरी वेळ नाही. यापूर्वी 22 जानेवारी रोजी देशाच्या नैऋत्य आणि पश्चिम भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्यामध्ये 10हून अधिक लोक जखमी झाले होते. 2011मध्ये जपानमध्ये आतापर्यंतचा सर्वात भीषण भूकंप झाला होता. देशाच्या पॅसिफिक किनार्यावरील टोहोकूजवळील समुद्रात रिश्टर स्केलवर 9 तीव्रता असलेला भूकंप झाला होता. या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीने प्रचंड विनाश घडवून आणला, ज्यामध्ये सुमारे 19,000 लोक मरण पावले, तर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.
Footage from #Japan after the magnitude 7.3 #earthquake. pic.twitter.com/7xjm26StdX
— deutschlandito (@deutschlandito) March 16, 2022