Electric Scooter | ड्रायव्हरकडे नव्हतं पोल्यूशन सर्टिफिकेट, पोलिसाने लावला दंड; लोकांनी अशी फिरकी घेतली..

Electric Scooter | एका इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter)मालकावर चक्क प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र नसल्याने दंड लावण्यात आला. फेसबूक सह इतर समाज माध्यमांवर हे ई-चलानची पोस्ट व्हायरल झाली आहे.

Electric Scooter | ड्रायव्हरकडे नव्हतं पोल्यूशन सर्टिफिकेट, पोलिसाने लावला दंड; लोकांनी अशी फिरकी घेतली..
ईलेक्ट्रिक स्कूटर मालकाला ठोठावला दंडImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 4:04 PM

Electric Scooter | केरळ वाहतूक पोलिसांचा (Kerala Traffic Police) एक मोठा कारनामा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) मालकाकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसल्याने पोलिसांनी त्याला ई-चलान दिले. या ई-चलानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुठे घडली घटना

या फोटोवरुन हे चलान या 6 सप्टेंबर रोजी जारी केल्याचे स्पष्ट होत आहे. केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यातील नीलांचेरी येथे हा प्रकार घडला. युजर्सनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांच्याकडे याप्रकरणात अपील दाखल केले आहे.

अथर 450X कंपनीची स्कूटर

मीडिया रिपोर्टसनुसार, इलेक्ट्रिक स्कूटर अथर 450X च्या मालकाला ई चलान देण्यात आले. ही ई-स्कूटर 2018 मध्ये बेंगळूरुमधील कंपनीने बाजारात दाखल केली. या कंपनीच्या ई-स्कूटरची ही तिसरी पिढी आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे वैशिष्ट्ये

अथर स्कूटर 5.4 kW ब्रशलेस इलेक्ट्रिक मोटर आणि 2.4 kWh लिथियम-आयन बॅटरीवर चालते. ही स्कूटर 3.9 सेकंदात शून्य ते 40 किमी/ तासाचा वेग पकडू शकते. ताशी 80 किमी/प्रति तास या सर्वोच्च वेगाने ही स्कूटर धावते. एकदा चार्जिंग केल्यावर ही स्कूटर 75 किमीपर्यंत धावू शकते.

केरळ पोलिसांनी ई-चलान दिले

केरळ पोलिसांनी ई-चलान दिले आहे. त्यानुसार, हे 250 रुपयांचे चलान आहे. मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या नियम 213(5)(ई) नुसार हा दंड लावण्यात आला आहे.

यापूर्वीही असाच प्रकार

असा विचित्र प्रकार काही पहिल्यांदाच झालेला नाही. जुलै महिन्यात केरळ मध्येच दुचाकीत योग्य प्रमाणात इंधन नसल्याच्या कारणावरुन दंड लावल्याचा प्रकार घडला होता.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.