Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | रेल्वेस्थानकामध्ये शिरला महाकाय हत्ती; पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही, पाहा व्हिडीओ

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक हत्ती मानवी वस्तीमध्ये शिरल्याचे दिसत आहे. (elephant in railway station video)

Video | रेल्वेस्थानकामध्ये शिरला महाकाय हत्ती; पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही, पाहा व्हिडीओ
हत्ती अशा प्रकारे रेल्वेस्थानकात शिरला होता.
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 10:09 PM

मुंबई : सोशल मीडिया हा असा मंच आहे; ज्यावर क्षणाक्षणाला हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. वेगवेगळे प्रँक, राजकीय, सामाजिक आणि इतर आश्चर्यकारक व्हिडीओ आपल्याला येथे सर्रास पाहायला मिळतात. यातही, प्राणी आणि पक्षांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळते. काही प्राण्यांचे व्हिडीओ आपल्याला समाधान आणि आनंद देऊन जातात. मात्र, सध्या असा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही अवाक् व्हाल. (Elephant entered in Railway station and walking video goes viral)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही ट्रेंडींग असतं. वेगवेगळ्या विषयांना घेऊन समाजमाध्यमांवर नेहमीच खुशखुशीत चर्चा केली जाते. मात्र, सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक हत्ती मानवी वस्तीमध्ये शिरल्याचे दिसत आहे. बरं हा हत्ती मानवी वस्तीमध्ये नुसता शिरला नाही, तर तो थेट रेल्वेस्थानकावर जाऊन रेल्वे रुळावर बिनधास्तपणे फिरतोय. हा हत्ती पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत. रेल्वे रुळावर उनाड हत्ती पाहून अनेकांनी आर्श्चय व्यक्त केले आहे.

रेल्वेरुळावर बिनधास्त फिरतोय हत्ती

व्हिडीओमध्ये आपल्याला हत्ती रेल्वे रुळावर बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसत आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे स्पष्टपणे दिसत नसलं तरी, हत्तीच्या छटा दिसू शकतात. रुळावर कोणताही हत्ती नसल्यामुळे तो रुळाच्या आजूबाजूने तसेच रुळावर फिरताना दिसतोय. यावेळी हा व्हिडीओ पाहून समोरुन जर रेल्वे आली तर मग काय होईल ? असा प्रश्न विचारला जातोय.

पाहा व्हिडीओ 

दरम्यान, हा व्हिडीओ @Saket_Badola या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्यक्तीने व्हिडीओ शेअर करताना मजेदार कॅप्शन लिहिले आहे. ‘रेल्वेच्या शोधात असलेला जंबो’ असे या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या व्यक्तीने व्हिडीओ अपलोड करताच, त्याला मोठ्या प्रमाणात रिट्विट केले जात आहे. तसेच, अनेकांकडून आश्चर्यसुद्धा व्यक्त केले जात आहे.

इतर बातम्या :

Shab-e-Barat 2021 | या वर्षी शब-ए-बारात कधी आहे? नेमकं काय होतं या दिवशी?, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Video | भूतानची छोटी मुलगी हात जोडून म्हणतेय Thank You भारत, व्हिडीओ बघून तुम्हीसुद्धा प्रेमात पडाल

Viral Memes | नाकातून रक्त काढून दाखवा, स्वप्नील जोशी ते अण्णा नाईक, सेलिब्रिटींकडून ऐका त्यांचे आवडते मीम्स

(Elephant entered in Railway station and walking video goes viral)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.