Viral Video : केरळमध्ये पिसाळलेल्या हत्तीनं उत्सवातल्या व्यक्तींना भिरकावलं
सोशल मीडियावर मल्लप्पुरम जिल्ह्यातील बीपी अंगाडी मशिदीतच्या उत्सवातला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. त्या व्हिडिओमध्ये भर उत्सवात एका पिसाळलेल्या हत्तीने धुमाकूळ घातला आहे.
सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे गमतीदार व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक हत्ती एका व्यक्तीला हवेमध्ये भिरकावताना दिसतोय. हा व्हिडिओ केरळमधील एका उत्सवादरम्यान काढण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये गजराज रागवल्याचे पाहायला मिळत आहे. या रागवलेल्या हत्तीने गर्दीतील एका व्यक्तीला थेट हवेमध्ये गोल गोल भिरकावल्याचे पाहायला मिळत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ केरळमधील मल्लप्पुरम जिल्ह्यातील बीपी अंगाडी मशिदीतच्या उत्सवादरम्यानचा आहे. या उत्सवामध्ये हत्तींना सजवण्यात आले त्यावेळी एक हत्ती पिसळला आणि त्यने गर्दीमधील एका माणसाला सोंडीमध्ये पकडत हवेमध्ये गोल गोल फिरवले. हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.
Kerala: An elephant lost control during the annual offering at BP Angadi Mosque in Tirur, Malappuram, injuring 24 people, one critically. The incident occurred at 12:30 a.m. and caused panic among attendees, who fled the scene pic.twitter.com/ebUnVvQeCY
— IANS (@ians_india) January 8, 2025
माहितीनुसार, ही घटना मल्लप्पुरममधील तिरूरमध्ये सकाळी साडेबाराच्या दरम्यान घडली होती. या घटनेमुळे २४ जण जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पुथियांगडी या उत्सवामध्ये सोन्याच्या पाट्यांनी सजलेले पाच हत्ती पाहायला मिळत आहेत. उत्सवामधील गर्दीतील लोक त्यांच्या मोबाईलमघ्ये शुटिंग करताना दिसत आहेत. त्यावेळी एका हत्तीली राग आला आणि त्या गर्दीमधील एका व्यक्तीला सोंडीमध्ये धरून हवेत भिरकावलं. हत्ती पिसाळल्यामुळे उत्सवातील लोकांची पळापळ झाली. पळापळ झाल्यामुळे अनेकजण जखमी देखील झाले आहेत. जखमी झालेल्या व्यक्तीला कोट्टक्कलमधील एमआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पिसाळलेल्या हत्तीचं नाव पक्कथु श्रीकुट्टन असं आहे.
मल्लप्पुरममधील उत्सवाला पाक्कथु श्रीकुट्टन नावाच्या हत्तीलाही सजवण्यात आले होते. परंतु उत्सवादरम्याण पाक्कथु श्रीकुट्टन हा हत्ती पिसाळला आणि त्यामुळे अनेकजण जखमी झाले. अनेक पुरुषांनी साखळदंड वापरून हत्तीला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला शांत करण्यासाठी सुमारे दोन तास लागले. या घटनेच्या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर भरपूर शेऊर करण्यात आलं होतं.