एक दिवस आम्ही भारतीय अंतराळवीरांना… , उद्योजक आनंद महिंद्र यांनी व्यक्त केल्या भावना
अब्जाधीश उद्योगपती आनंद महिंद्र हे सोशल मिडीयावर नेहमीच महत्वाच्या मुद्द्यांना पुढे आणतात. त्यांच्या पोस्ट सर्वांनाच प्रेरक असतात.
नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : उद्योजक महिंद्र हे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतात. त्यांच्या ट्वीटरवरील ( आता एक्स ) पोस्ट नेहमीच उद् बोधक आणि प्रेरक असतात. त्यांच्या ट्वीटरवरील पोस्टमुळे त्याच्या फॉओअरची संख्या मोठी आहे. त्यांनी अनेक महत्वाच्या विषयावर ट्वीट केले असून त्यातून अनेक नवीन मुद्दे चर्चेला आले आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे चंद्रयान-3 उतरविल्यामुळे भारताचे नाव अंतराळ क्षेत्रात दुमदुमत आहे. चंद्रावरील सहा चाकी रोव्हरने अनेक महत्वाचे निरीक्षणे आतापर्यंत पाठविली असून आज त्याने चंद्रावर ज्यातून तो उतरला त्या विक्रम लॅंडरचा सेल्फी पाठविल्याने उद्योजक आनंद महिंद्र बेहद्द खूष झाले आहेत. पाहा त्यांनी काय म्हटलेय…
अब्जाधीश उद्योगपती आनंद महिंद्र हे सोशल मिडीयावर नेहमीच महत्वाच्या मुद्द्यांना पुढे आणतात. त्यांच्या पोस्ट सर्वांनाच प्रेरक असतात. उद्योजक आनंद महिंद्र यांनी बुधवारी प्रज्ञान रोव्हरने काढलेल्या चंद्रयान-3 च्या लॅंडर विक्रमच्या पहिल्या फोटोवर प्रतिक्रीया दिली आहे. ते या पोस्टमध्ये म्हणतात की, जॉ ड्रॉपिंग इमेज, हे कदाचित मी पाहीलेला सर्वोत्तम सेल्फी फोटो असावा. महिंद्र पुढे म्हणतात की आणि एक दिवस आम्ही भारतीय अंतराळवीरांना विक्रम लॅंडर शेजारी सेल्फी घेताना पाहू ! त्यांनी पुढे लिहीलेय की प्रतिमा रोव्हरच्या नेव्हीगेशनच्या कॅमेऱ्याने टीपली आहे. आनंद महिंद्र यांच्या या पोस्टला 8,257 युजरने लाईक्स केले आहे.
आनंद महिंद्र यांचे ट्वीट येथे पाहा –
Jaw dropping image. This may just be the best Self-Portrait that I’ve ever seen…. And one day, we’ll see Indian Astronauts taking selfies next to it… https://t.co/k6Iu6lmO9t
— anand mahindra (@anandmahindra) August 30, 2023
भारताच्या महत्वाकांक्षी मोहीम चंद्रयान-1 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करीत इतिहास रचला आहे. या विक्रम लॅंडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला असून तो चंद्रावरील पृष्ठभागाविषयी रोज नवीन माहिती पुरवित आहे. आधी चंद्रावरील तापमानाबाबत रोव्हरने माहीती दिली. तेथील तापमान 50 ते 70 डीग्री सेल्सिअस तर विवरातील तापमान मायनस 10 असं टोकाचे असल्याचे त्यानं सांगितले. तेथे ऑक्सिजन आणि सल्फर ही मुलद्रव्ये असल्याचेही प्रज्ञान रोव्हरने सांगितले आहे.