गरिबीत संघर्ष केला, त्यानंतर वयाच्या 23 व्या वर्षी करोडपती झाली, यश मिळवण्यासाठी तिने…
Trending news : एका मुलीचं असं म्हणणं आहे की, तिच्या आई वडिलांनी पैसे कमावण्यासाठी अधिक मेहनत घेतली आहे. त्यामुळे तरुणीने लहान असल्यापासून पैसे कमावण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : एका २३ वर्षाच्या मुलीने सांगितलं की, तिने गरिबीचा अधिक सामना केला आहे. पैसे कमावण्यासाठी तिने अधिक मेहनत घेतली. परंतु सध्या ती करोडपती (viral news in marathi) झाली आहे. तिने कमी वयात ८ करोड रुपये कमावले आहेत. त्या मुलीचं नाव लिली जरेंबा आहे. तिचं म्हणणं आहे की, तिचा जन्म कॅनडामधील (canada story in marathi) टोरंटो येथे झाला आहे. एका व्हिडीओमध्ये (Trending news) तिने आपला प्रवास सांगितला आहे.
द सनच्या माहितीनुसार, लिलीचं म्हणणं आहे की, तिची आई चीनची आहे. त्याचबरोबर तिचे वडील पोलंडमधील आहेत. दोघंही संघर्षाच्या काळात कॅनडामध्ये आले. तिच्या आई वडिलांनी पैशासाठी अधिक मेहनत घेतली. त्याचवेळी तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की, आपली मुलगी अशा पद्धतीने मेहनत करेल, तर ती अधिक पैसा कमावेल. त्यांना अधिकचं बील भरत असताना मोठा प्रॉब्लेम व्हायचा. सुट्टीवरती कधीही जात नव्हते. कमी पैसे असल्यामुळे सरकारच्या घरात ती राहिली आहे.
लीलीने लहान असताना काम सुरु केलं
लीलीने सांगितलं की, ती इतरांच्या सारखं कोणाचंही अनुकरण करणार नव्हती. ती १० ते १३ वर्षाची असताना तिने एक व्यवसाय सुरु केला. तिने डिजीटल आर्टवर्क क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली, तिथून तिला पैसे मिळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी ती त्यातून ४ हजार ते १२ हजार रुपये कमावत होती. त्यानंतर लिलीने ड्रॉप शिपिंगचं काम सुरु केलं. पण तिने जास्त विचार केला नाही.
या व्यवसायात मिळालं यश
काम करीत असताना ४ ते ५ महिन्यांनी तिला चांगलं प्रॉडक्ट मिळालं. त्यावेळी तिला ६५ हजार रुपये मिळाले. त्यावेळी लिली ऑनलाईन पैसे कमावण्यात तिला यश मिळालं होतं. तिने तिच्या वयाच्या १९ व्या वर्षी निर्णय घेतला होता. त्यावेळी ती विद्यार्थीनी होती. ती कोड क्रैक करायचा विचार करत होती. ती ऑनलाईन पैसा कमावायच्या विचारात होती. त्यासाठी तिने आपल्या आईचं घर सोडलं होतं. ती एका भाड्याच्या घरात राहत होती. त्यावेळी तिने Airbnb बनवायचा निर्णय घेतला.
लाखो रुपये मिळायला लागले
त्यातून लिलीला दोन ते तीन लाख रुपये मिळाले. त्यामधून तिला १६ लाख रुपयांचा फायदा झाला. पहिल्यांदा राहायला आलेल्या लोकांनी एका आठवड्यात तिला ८२ हजार रुपये दिले. तशीचं पुढे कमाई १० लाख रुपयांपर्यंत गेली. वयाच्या २३ व्या वर्षी त्या तरुणीने आठ करोड रुपये कमावले आहेत. लोकांना लिलीची स्टोरी अधिक आवडली आहे.