Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check: चित्त्यांचा हा फोटो खरंच कुनो नॅशनल पार्कमधील आहे का? काय आहे फोटोमागचं सत्य?

हा फोटो कुनो राष्ट्रीय उद्यानातला आहे का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, मात्र जेव्हा आम्ही याची पडताळणी केली, तेव्हा असं लक्षात आलं की...

Fact Check: चित्त्यांचा हा फोटो खरंच कुनो नॅशनल पार्कमधील आहे का? काय आहे फोटोमागचं सत्य?
चित्त्याचा हा फोटो खरंच कुनो नॅशनल पार्कमधील आहे का?
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 7:35 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी (PM Narendra Modi Birthday) भारतात पहिल्यांदाच चित्त्यांचं आगमन झालं. नामिबीयातून हे चित्ते भारतात आले. मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park ) 8 चित्त्यांना (Cheetah) खुद्द पंतप्रधान मोदींनी सोडलं आणि पुन्हा एकदा आपल्या पर्यावरणातून संपलाला चित्ता, आपल्यात परतला. मात्र, त्याच्या अवघ्या 2 दिवसांनंतर आता एक फोटो (Fact Check) चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत एक चित्ता मनमोकळेपणे मातीत लोळताना दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Photo) होत आहे.

या फोटोवर दावा केला जातोय की, हा फोटो कुनो राष्ट्रीय उद्यानातला आहे, जिथं हे चित्ते चांगलीच मजामस्ती करत आहे, भारतातील वातावरण चित्त्यांना चांगलंच भावलं आहे. भारतातील वातावरण हे चित्त्यांना चांगलंच भावलं आहे. मात्र यात किती तथ्य आहे, हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला, या प्रयत्नात वेगळीच माहिती हाती आली.

हा फोटो कुनो राष्ट्रीय उद्यानातला आहे का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, मात्र जेव्हा आम्ही याची पडताळणी केली, तेव्हा असं लक्षात आलं की, हा फोटो जुना आहे. जो तुम्हीही सहज गूगल इमेजेसमध्ये पाहू शकता. म्हणजे, हा फोटो कुनो राष्ट्रीय उद्यानातला नाही तर दुसऱ्या ठिकाणचा आहे. म्हणूनच प्रश्न पडतो, की हा फोटो नेमका आहे तरी कुठला?

हे सुद्धा वाचा

तुमच्या हाही प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधलं, तेव्हा असं कळालं की, हा फोटो सव्हानाच्या जंगलातला आहे, जिथं हे बिबटे मजामस्ती करताना दिसत आहेत. हा फोटो अद्रेंज कुबीक या फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात क्लिक केला आहे. सव्हानाच्या जंगलात शिकार केल्यानंतर आराम फरमवतानाचा हा फोटो आहे.

फोटोग्राफर आंद्रेज कुबीक यांचे इतर फोटो तुम्ही खालील लिंकवर पाहू शकता

भारतात आलेले चित्त्यांना सध्या संरक्षित वातावरणात ठेवण्यात आलं आहे. जिथं त्यांच्यासाठी शिकारही सोडण्यात आले आहेत, मांजर कुळातील कुठलाही प्राणी दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर त्या वातावरणात मिसळण्यास थोडा वेळ घेतो, तसाच वेळ हे चित्तेही घेत आहेत. ते मजेत आहे, त्यांना चांगलं खाद्यही दिलं जात आहे, या चित्त्यांपासून प्रजनन करुन पुन्हा एकदा देशात चित्त्यांचा अधिवास वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, त्यासाठी व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावरुन जे फोटो व्हायरल केले जात आहेत, त्यामध्ये तथ्य नसल्याचं या पडताळणीत समोर आलं आहे.

संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.