“सरकारने सर्वात आधी शालूच्या फोटोवरील कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा”

शालू फेम राजेश्वरी खरातच्या चाहत्यांनी तिच्या लोकप्रियतेची संचारबंदीशी सांगड घालत मीम्स तयार केले आहेत. (Rajeshwari Kharat memes Lockdown)

सरकारने सर्वात आधी शालूच्या फोटोवरील कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा
नुकतंच राजेश्वरीला कोरोनाची लागण झाली होती. आता ती कोरोनामुक्त झाली असून सोशल मीडियावरही सक्रिय झाली आहे.
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 4:05 PM

मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित फँड्री (Fandry) चित्रपटातील जब्या-शालूची (Jabya Shalu) अनवट प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सिनेमा रिलीजनंतर जितकी गाजली नव्हती, त्यापेक्षा जास्त ती सध्या सोशल मीडियावर भाव खाऊन जात आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकवरील फोटोंमुळे राजेश्वरी चांगलीच लोकप्रिय झाली आहे. त्याहीपेक्षा शालूच्या मीम्समुळे ती अधिक चर्चेत आहे. (Fandry Movie Marathi Actress Rajeshwari Kharat memes on Maharashtra Lockdown)

अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर फोटो शेअर केल्यानंतर त्यावर लाईक्स आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडतो. राजेश्वरीने फोटो शेअर करताच त्यावर चाहत्यांच्या उड्या पडतात. तिच्या प्रत्येक फोटोवर हजारोच्या संख्येने कमेंट्स असतात. तर लाईक्सचा आकडाही सहज सत्तर हजारांच्या दिशेने धाव घेतो. त्यात लव्ह रिअॅक्शन्सचा भरणा अधिक असतो, हे वेगळं सांगायला नकोच.

राजेश्वरीच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

राजेश्वरी खरातच्या फोटोवर कमेंट्सचा महापूर येतो. राजेश्वरीच्या लूक्सचं कौतुक करणाऱ्या चारोळ्याही त्यामध्ये असतात. विशेष म्हणजे त्यापैकी काही कमेंट्सना राजेश्वरी स्वतः उत्तरही देते. त्यामुळे तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये अहमहमिका रंगलेली असते. चाहते आपल्या लाडक्या शालूचे फोटोही मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या वॉलवर शेअर करतात. त्यामुळे तिच्या फोटोवरील कमेंटमधल्या ‘शेरां’सोबत सव्वाशेरांनी केलेल्या शेअर्सची संख्याही सव्वाशेच्या घरात जाते.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांसाठी संचारबंदीसह कठोर नियम लागू केले आहेत. बागबगिचे, मैदानं, मॉल, सिनेमागृह, बीच यासारखी गर्दीची ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. मात्र शालूच्या चाहत्यांनी त्यावरुनही मीम्स तयार केले आहेत. (Rajeshwari Kharat memes Lockdown)

राजेश्वरीवर मीम्स

“सरकारने सर्वात आधी फँड्रीतल्या शालूच्या फोटोवरच्या कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा, तिथेच सर्वात जास्त गर्दी होते” असे मीम सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. आता शालू उर्फ राजेश्वरी खरात, या मीमवर काही रिअॅक्शन देणार का, याकडेही चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

पाहा मीम

संबंधित बातम्या :

‘वय विचारू नका, थोडी लाज वाटते…’, ‘शालू’ने खास अंदाजात दिल्या स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

प्राचीचा साखरपुडा ते वीकेंडला पोरांचा ट्रेक प्लॅन, मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हमध्ये भन्नाट कमेंट्स

(Fandry Movie Marathi Actress Rajeshwari Kharat memes on Maharashtra Lockdown)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.