Viral CCTV: चिमुरडीला वाचवायला बाप गेला, पण माकडाने त्याच्यावर हल्ला केला, माकडांच्या दहशतीचा व्हायरल व्हिडीओ
मुलीचा आवाज ऐकल्यानंतर मयंक घराबाहेर आहेल, तेव्हा मुलीला माकडांनी घेरलेलं त्यांना पाहायला मिळालं. मयंक घाबरले आणि ते थेट माकडांना पळवून लावायला लागले.
उत्तर प्रदेशात माकडांनी थैमान घातलं आहे.दिवसाआड माकडांच्या हल्ल्यांच्या बातम्या येत आहे. असाच एक व्हिडीओ आता उत्तर प्रदेशातल्या हातरसमधून समोर आला आहे. ज्यामध्ये एका चिमुरडीवर जेव्हा माकडांनी हल्ला केला, तेव्हा बाप तिला वाचवण्यासाठी पुढे आला. मात्र, या मुजोर माकडांनी त्या बापालाही जुमानलं नाही, आणि त्याच्यावरच हल्ला चढवला. हा सगळा प्रकार चौकात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हाथरसमध्ये राहणाऱ्या एका पत्रकाराच्या मुलीवर माकडांनी हल्ला केला. त्यानंतर हा पत्रकार त्या मुलीला वाचवण्यासाठी बाहेर आले. मात्र, माकडांच्या हल्ल्यातून तेही सुटू शकले नाही. मयंक वशिष्ठ असं या पत्रकाराचं नाव आहे.
मुलीचा आवाज ऐकल्यानंतर मयंक घराबाहेर आहेल, तेव्हा मुलीला माकडांनी घेरलेलं त्यांना पाहायला मिळालं. मयंक घाबरले आणि ते थेट माकडांना पळवून लावायला लागले. त्यानंतर माकडांनी पळून जाण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवा केली.
एका माकडाने तर अचानक मयंक यांच्या अंगावर झेप घेतली. आणि त्यांना खाली पाडलं. या हल्ल्यात मयंत यांच्या अंगावरील शर्ट फाटला आणि त्यांना खरचटलं.
व्हिडीओ पाहा:
उत्तर प्रदेश के हाथरस में बढ़ा बंदरों का आतंक. बच्ची को बचाने आए पिता पर ही बोल दिया हमला. वीडियो वायरल…#UPNews @Uppolice #ViralVideo pic.twitter.com/TTNbnKcwnS
— Sonu Sharma (@sonu2media123) September 17, 2022
यूपीत गेल्या काही काळापासून माकडांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी एका महिलेला माकडांनी धक्का देऊन खाली पाडलं होतं, ज्यात तिला जबर मार लागला होता. ही माकडं टोळीने फिरतात, त्यामुळे सगळीकडे त्यांची दहशत आहे. माकडांच्या या दहशतीमुळे लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत.
माकडांच्या या दहशतीला कंटाळून एका नागरिकाने कोर्टामध्ये जनहित याचिकाही टाकली आहे. मधुशंकर अग्रवाल असं या याचिकाकर्त्याचं नाव आहे. यामध्ये लोकांवर हल्ल्यांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं नुकसान हाही मुद्दा आहे. यावर कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला नोटिसा बजावल्या आहेत.
दरम्यान माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाकडून एक विशेष पथकही तयार करण्यात आलं आहे, ज्यांना गाड्या आणि साहित्य पुरवण्यात आलं आहे. जे या माकडांना पकडतात, आणि शहरापासून दूर नेऊन सोडतात. मात्र, ही माकडं पुन्हा शहरात शिरतात, आणि पुन्हा एकदा धुडगूस घालतात.