न्यायालयातच वडिलांची झाली होती हत्या, मुलगी बनली डीएसपी, पण म्हणते मला आपीएस बनायचय…

माझ्या वडिलांची न्यायालयाच्या दारातच हत्या करण्यात आली होती. 23 फेब्रुवारी 2015 रोजी, शूटर रिंकूच्या हत्येप्रकरणी मुरादाबाद तुरुंगात बंद असलेल्या भुरा आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यायालयातच वडिलांची झाली होती हत्या, मुलगी बनली डीएसपी, पण म्हणते मला आपीएस बनायचय...
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 12:28 AM

नवी दिल्ली : मुरादाबादमधील आशियाना कॉलनीमधील घर नंबर एचआयजी ए 120 वर प्रचंड गर्दी जमली आहे. याआधी आठ वर्षापूर्वीही अशीच गर्दी या घरासमोर जमली होती. मात्र आजच्या आणि आठ वर्षापूर्वीच्या त्या गर्दीत मात्र फरक आहे.त्यावेळी डिलारीचे विभागीय पोलीसप्रमुख योगेंद्र सिंह उर्फ भुरा यांना लोकं त्यांना भेटण्यासाठी येत होती. तर आज त्यांची मुलगी आयुषीला भेटण्यासाठी आणि तिचे अभिनंदन करण्यासाठी लोकं आज या घराकडे वळत आहेत. आयुषीचे वडिला योगेंद्र सिंह यांची 2015 साली न्यायालयाच्या परिसरात त्यांची हत्या करण्यात आली होती.

आयुषीने उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (UPPSC)ची वयाच्या 24 व्या वर्षी ती परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. आणि या परीक्षेत तिने पोलीस उपअधीक्षक पदासाठी निवड झाली आहे.

आयुषीने दिल्लीत राहुन परीक्षेची तयारी करत होती. शनिवारी निकाल आल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास मुरादाबाद येथील तिच्या घरी ती पोहोचली होती.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी तिच्या वडिलांची आठवण काढून प्रश्न विचारले त्यावेळी ती प्रचंड भावूक झाली होती. त्यावेळी ती म्हणाली की मी अधिकारी बनणे हे माझ्या वडिलांचे स्वप्न होतं. मात्र तिचे ध्येय पीपीएस होण्याचे नाही, तर आयपीएस बनण्याचे आहे.

यासाठी ती खूप मेहनतही घेत आहे आणि तिला पूर्ण विश्वास आहे की लवकरच ती आयपीएस अधिकारीही होईल याची. यावेळी तिला विचारण्यात आले की, तुला नागरी सेवेत कधी जावे असं वाटलं, त्यावर ती म्हणाली की, हे माझ्या वडिलांचे स्वप्न होतं. जे मी पूर्ण केले आहे. माझे वडील मला नेहमी सांगत होते, की मला अधिकारी व्हायचे आहे. ही गोष्ट माझ्या मनात पहिल्यापासूनच स्पष्ट होती.

इंटरमिजिएटनंतर लगेचच मी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. माझी पदवी राज्यशास्त्रातातून झाली आहे कारण मला नागरी सेवांसाठी हा विषय निवडायचाच होता. त्यानंतर तिला विचारण्यात आले की, पोलीस सेवा निवडण्याचे काही कारण काय तर त्यावर बोलताना म्हणाली की, असं कोणतंही विशिष्ट कारण नाही.

पण एसडीएम पदासाठी मी पहिली पसंती दिली होती. पण, रँकनुसार मला अतिरिक्त पोलीस उपाधीक्षक हे पद मिळाले आहे. मला पोलिसात राहून महिलांवरील गुन्ह्यांवर कठोर कारवाई करायला आवडेल.

महिलांसाठी जे काही कायदे आहेत, त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी माझे प्राधान्य असणार आहे. आज यूपीमध्येही हुंड्याची प्रकरणे वाढत आहेत.

महिलांवरील गुन्हे कमी करण्यासाठी मला गांभीर्याने काम करायचे आहे. त्यामुळेच मी हे पद प्राधान्याने निवडले होते असंही ती म्हणाली.

या पदापर्यंत पोहचण्यापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता, या प्रश्नावर आयुषी म्हणाली की, नागरी सेवांची तयारी हा खूप लांबचा प्रश्न आहे. त्यासाठी खूप संयमही लागतो. त्या परीक्षेत एकदा तुम्ही अयशस्वी झालात की तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते.

कधी कधी आपणही अपयशी होतो. या अशा परिस्थितीत पुन्हा पूर्व परीक्षेपासून तयारी करावी लागते. कधीकधी असे वाटते की हे यश मिळेल की नाही.

या परीक्षेच्या कार्यकाळात खूप मोठे चढउतार आहेत आणि ते संयमानेच पार करावे लागतात असंही आयुषी सांगते. आज जरी हे मला पद मिळाले असले तरी पहिल्या प्रयत्नात हे पद मिळाले नाही तर दुसऱ्या प्रयत्नात मला हे पद मिळाले आहे.

तुमच्या वडिलांची हत्या झाली तेव्हा तुम्ही कोणत्या वर्गात होता? या प्रश्नावर मात्र ती भावूक झाली आणि सांगू लागली की, 2015 मध्ये जेव्हा माझ्या वडिलांची हत्या झाली तेव्हा मी 11 वी मध्ये शिकत होते. त्या घटनेने मात्र सगळं कुटुंबच उद्धवस्त झाले होते.

माझ्या वडिलांची हत्या झाल्यानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. घरातले सगळे टेन्शनमध्ये होते. तेव्हा माझे शिक्षण सुरू ठेवणे सोपे नव्हते.मात्र त्याकाळात अधिकारी होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा निर्धार पक्का होता असंही ती सांगते. त्या घटनेवेळी मी अकरावीत होते.

मी 12वी पूर्ण होताच मुरादाबादहून दिल्लीला गेले. त्याचवेळी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला आणि पुढील तयारी सुरू केली. वडिलांची हत्या झाल्यानंतर मी आणि माझं संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालो होतो.

पण, अर्जुन भैयाने आमच्या संपूर्ण कुटुंबाला मदत केली. आम्हाला कधीही कोणतीही समस्या येऊ दिली नाही. त्यांच्यामुळेच मी आणि माझा भाऊ आमचा अभ्यास सुरू ठेवू शकलो. माझा धाकटा भाऊ आयआयटी, दिल्ली येथून एमटेक करत आहे.

माझ्या वडिलांची न्यायालयाच्या दारातच हत्या करण्यात आली होती. 23 फेब्रुवारी 2015 रोजी, शूटर रिंकूच्या हत्येप्रकरणी मुरादाबाद तुरुंगात बंद असलेल्या भुरा आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. भुरा कोर्टरूमच्या बाहेर एका बाकावर बसून कोर्टात आपली बोलवण्याची वाट पाहत होता.

त्याच्या शेजारी पोलिस तैनात होते. त्यानंतर रिंकूचा भाऊ सुमित तेथे पोहोचला, त्याने भुराच्या पायाला स्पर्श केला आणि त्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या. कोर्टात पोलिस कोठडीत भुरा याचा गोळ्या झाडून मृत्यू झाला.

4 मार्च 2013 रोजी विद्यार्थी नेता आणि शार्प शूटर रिंकू चौधरीच्या हत्येप्रकरणी भोजपूरमधील हुमायूनपूर गावातील रहिवासी असलेला दिलारी ब्लॉक प्रमुख योगेंद्र सिंह उर्फ ​​भुरा याचे नाव समोर आले होते. 20 जानेवारी 2014 रोजी भुरा याने न्यायालयात आत्मसमर्पण केले आणि तेव्हापासून तो तुरुंगात होता.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...