VIDEO | धाडसी तरुणीकडून दोन नागांना जीवदान, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा कौतुक कराल
Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोन विषारी नाग दिसत आहे. त्या नागांना एका तरुणीने ताब्यात घेऊन त्यांना जीवदान दिले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांनी त्या तरुणींचं कौतुक केलं आहे.
मुंबई : साप दिसल्यानंतर (snake video) अनेकांना घाम फुटतो, त्यावेळी काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. साप दिसल्यानंतर भीतीमुळे अनेकजण सैरभैर होऊन इकडे-तिकडे पळत राहतात. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (social video)व्हायरल झाले आहेत. साप चावल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेकजण साप दिसल्यानंतर त्यांना मारतात. आपल्या देशात असे काही लोकं आहेत, जे प्राण्यांच्यावरती प्रेम करतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायम जागृत असतात. सद्या असाचं एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका तरुणीने दोन सापांना (viral video) ताब्यात घेतलं आहे.
दोन साप असल्यामुळे तिथं लोकं घाबरली आहेत. पण तिथं एक धाडसी मुलगी दाखल होते आणि अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं पाहायला मिळतं. ती मुलगी दोन साप खेळत असताना उडी घेते. त्याचवेळी हा सगळा प्रकार कोणीतरी मोबाईलमध्ये शुट करीत आहेत. दोन सापांना पकडताना त्या तरुणीला अधिक त्रास झाला आहे. साप पकडण्याच्या आगोदर त्या तरुणीने आपल्या पायातील चप्पल देखील काढलं आहे. त्या तरुणीने जे काही धाडस केलं आहे. त्याची सगळीकडे चर्चा आहे. त्याचबरोबर अधिक नेटकऱ्यांनी त्या तरुणीचं कौतुक देखील केलं आहे. हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष खेचत आहे.
तरुणीने दोन सापांना ताब्यात घेतलं
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवरती शेअर केला आहे. हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती @_dekhbhai_ या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत तरुणी एका कोपऱ्यातून सगळा प्रकार बघत आहे. नाल्याच्या बाजूला दोन साप खेळत आहेत. ती तरुणी थेट तिथं उडी घेऊन सापांना ताब्यात घेते. ती सापांना अजिबात घाबरत नसल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
View this post on Instagram
ज्यावेळी एका सापाला मोका मिळतो, त्यावेळी तिथं समोर असलेल्या नाल्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी महिला चपळाई दाखवत त्या सापाला सुद्धा ताब्यात घेते. हा व्हिडीओ आतापर्यंत 33 हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. नऊ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.