VIDEO | मादीला पटवण्यासाठी तितराचा पिसारा फुलवून डान्स, नेटिझन्स म्हणतात भावा सोड, तिला इंटरेस्ट नाही

नर तिच्यासमोर घसाफोड करतोय, पंख पसरुन दाखवतोय, तरी तिला त्याच्यामध्ये रस दिसत नाही. ती चालू पडल्याचं दिसतं. (Female Pheasant Mating Dance)

VIDEO | मादीला पटवण्यासाठी तितराचा पिसारा फुलवून डान्स, नेटिझन्स म्हणतात भावा सोड, तिला इंटरेस्ट नाही
तितराचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 3:36 PM

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपलं सहज लक्ष वेधून घेत असतात. टाईमलाईन स्क्रोल डाऊन करताना असे काही व्हिडीओ चटकन आपली नजर खिळवून ठेवतात. मादीला पटवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या एका तितराचा व्हिडीओही नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नर पिसारा फुलवून नृत्य करताना दिसतो, परंतु मादी त्याला जराही भाव देत नाही. (Female Pheasant Not Impressed by Mating Dance)

व्हिडीओमध्ये काय?

नर ओरडू लागले की आसपासच्या माद्या त्यांच्या आवाजाकडे आकर्षित होऊन त्यांच्या दिशेने येतात, असा सर्वसाधारणपणे म्हटले जाते. मात्र व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तितर मादीचा स्वॅग जरा भलताच आहे. नर तिच्यासमोर घसाफोड करतोय, पंख पसरुन दाखवतोय, तरी तिला त्याच्यामध्ये रस दिसत नाही. ती चालू पडल्याचं दिसतं.

नेटिझन्स काय म्हणतात?

हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सची हसून पुरेवाट झाली आहे. कोणी म्हणतंय कसला सॉलिड अॅटिट्यूड दाखवत आहे, तर कोणी हिला बघून मला माझ्या एक्स गर्लफ्रेण्डची आठवण झाली, अशी मजेशीर कमेंटही केली आहे. या व्हिडीओला 24 तासातच 14 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तर दोन लाखांहून जास्त लाईक्स आहेत. जवळपास 21 हजार नेटिझन्सनी कमेंट केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

तितर म्हणजे काय?

तितर हा मध्यम आकाराचा कोंबडीसारखा एक पक्षी असतो. जगभर या प्रजातीच्या सुमारे 40 जाती असून त्यापैकी पाच आशियात तर उर्वरित जाती आफ्रिकेत आढळतात. भारतात करडा तितर (फ्रँकोलायनस पाँडिसेरिॲनस), काळा तितर (फ्रँकोलायनस फ्रँकोलायनस) आणि रंगीबेरंगी तितर (फ्रँकोलायनस पिक्टस) या तीन जाती आढळतात. त्यांपैकी करडा तितर ही जाती सर्वत्र आढळते. काळा तितर उत्तर प्रदेश आणि आसामात तर रंगीबेरंगी तितर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दक्षिणेकडे आढळतो. (Female Pheasant Not Impressed by Mating Dance)

तितर पक्ष्याची लांबी सुमारे 29 ते 34 सेंमी. असते. त्याच्या पाठीचा रंग करडा तपकिरी असून त्यात तांबूस रंगाची छटा असते. पोटाकडचा भाग पिवळसर असून त्यावर गडद तपकिरी नागमोडी रेघोट्या असतात. शेपूट आखूड आणि काळसर तांबूस रंगाची असते. हनुवटी, गळा आणि कपाळ केशरी असते. गळ्यावर चंद्रकोरीसारखा एक आडवा पट्टा असतो. चोच काळसर आणि पाय मळकट तांबडे असतात. नर आणि मादी दिसायला सारखे असले, तरी नर आकाराने किंचित मोठा असतो आणि त्याच्या पायावर कोंबड्याप्रमाणे एक टोकदार नक्षी असते.

(तितर पक्षाची माहिती संदर्भ : मराठी विश्वकोष – लेखक शिवाप्पा किट्टद)

संबंधित बातम्या :

Video | तहानलेला गरुड तृप्त, वाटसरुने रस्त्यावरच पाजले पाणी, व्हिडीओ व्हायरल

Video : भेदक नजर, विजेसारखा वेग, मांजरीने केलेली ‘ही’ शिकार एकदा पाहाच

(Female Pheasant Not Impressed by Mating Dance)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.