Photos : अडीच कोटींच्या फेरारीची अडीच किलोमीटरवरच दुर्दशा! अपघातानं तरुणाच्या ड्रीम कारचा चक्काचूर
Ferrari car accident : मेहनत करून अडीच कोटी रुपयांची फेरारी कार खरेदी (Buy) केली होती. मात्र शोरूममधून (Showroom) बाहेर पडताच कारला भीषण अपघात (Accident) झाला आणि अडीच कोटी रुपयांच्या कारची दुर्दशा झाली.
Ferrari car accident : काही लोक खूप भाग्यवान असतात, तर काही लोकांचे नशीब खूप वाईट असते. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याचे दुर्भाग्य क्वचितच कोणाचे असेल. या व्यक्तीने बरीच मेहनत करून अडीच कोटी रुपयांची फेरारी कार खरेदी (Buy) केली होती. मात्र शोरूममधून (Showroom) बाहेर पडताच कारला भीषण अपघात (Accident) झाला आणि अडीच कोटी रुपयांच्या कारची दुर्दशा झाली. मेट्रोच्या बातमीनुसार, इंग्लंडमध्ये राहणारा एक तरुण अनेक दिवसांपासून पैसे गोळा करत होता. मोठ्या परिश्रमाने पैसे जमवल्यानंतर हा तरूण आपल्या ड्रीम कार खरेदीसाठी शोरूममध्ये गेला. शोरूममध्ये पोहोचल्यानंतर तरुणाने नवीन फेरारी 488 खरेदी केली. या कारची किंमत अडीच कोटी रुपये होती. आपल्या ड्रीम कार मिळाल्याने तरुणाला खूप आनंद झाला. यानंतर शोरूममधून कार घेऊन तो घराकडे निघाला.
पोलिसांनी शेअर केला फोटो
तरुणाचा आनंद फार काळ टिकला नाही, कारण शोरूममधून बाहेर पडल्यानंतर केवळ 3 किलोमीटर पुढे असताना कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे या अपघातात तरुणाला फारशी दुखापत झाली नसून तो पूर्णपणे सुखरूप आहे, मात्र अडीच कोटींच्या गाडीची अवस्था दुरवस्थेत बदलली. डर्बीशायर पोलिसांनी 1 एप्रिल रोजी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर घटनेचा फोटो शेअर केला.
Derby. 1st April. Driver bought a Ferrari this morning and crashed it after driving it less than 2 miles. No injuries. #DriveToArrive pic.twitter.com/X4IMuflPa5
— Derbyshire Roads Policing Unit (@DerbyshireRPU) April 1, 2022
‘ते’ एप्रिल फूल नव्हते
एप्रिल फूलच्या दिवशी फोटो शेअर केल्यावर, अडीच कोटी रुपयांची कार विकत घेतल्यानंतर आधी लोकांना त्याचा अपघात झाला यावर विश्वास बसला नाही, पण पोलिसांनी आणखी एक ट्विट करून लोकांना सांगितले, की हे अजिबात एप्रिल फूल नाही. पोलिसांनी सांगितले, की तरुणाने फेरारी 488 कार खरेदी केल्यानंतर शोरूमपासून केवळ 3 किमी अंतरावर पोहोचला असावा, जेव्हा त्याच्या कारला अपघात झाला.