Video | आपल्या पिलांसाठी आई तब्बल तीन सापांशी भिडली, पाहा कोंबडीचा थरारक लढा

या व्हिडीओमध्ये एका कोंबडीने आपल्या पिलांना सापाच्या तावडीतून वाचवण्यासाठी केलेली धडपड सगळ्यांना आश्चर्यचकित करतेय. (fight between hen and snake video)

Video | आपल्या पिलांसाठी आई तब्बल तीन सापांशी भिडली, पाहा कोंबडीचा थरारक लढा
hen and snake
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 5:26 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यामध्ये काही व्हिडीओ हे खळखळून हसायला लावतात. तर काही व्हिडीओ हे आपल्याला विचार करायला लावणारे असतात. काही व्हिडीओमध्ये मानवी मनाच्या तसेच प्राण्यांच्या भावनांना दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक फेसबुकवरील व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओमध्ये एका कोंबडीने आपल्या पिलांना सापाच्या तावडीतून वाचवण्यासाठी केलेली धडपड सगळ्यांना आश्चर्यचकित करतेय. (fight between Hen and Snake video goes viral on social media)

सापांच्या तावडीत कोंबडी आणि तिचे पिलं

असं म्हणतात की मातेच्या मायेला काही सीमा नसतात. आईचे प्रेम हे निस्वार्थ आणि पारदर्शी असतं. त्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. त्याचीच प्रचिती एका व्हिडीओमधून येतेय. या व्हिडीओमध्ये एक कोंंबडी आणि तिच्या पिलांना अनेक सापांनी घेरलं आहे. हे साप नुकत्याच जन्मलेल्या पिलांना गिळंकृत करण्यासाठी टपून बसले आहेत. सापांचा हा डाव ओळखून या कोंबडीने पिलांन आपल्या पंखाखाली घेतलं आहे. ती आपल्या पिलांचे जमेल त्या पद्धतीने रक्षण करत आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

पिलांना वाचवण्यासठी कोबंडीचा कसोशीने प्रयत्न

एका जुन्या घरात कोंबडी आणि तिच्या पिलांना सापांनी घेरलं आहे. यामध्ये कोंबडी आपल्या पिलांना घेऊन लपण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा जेव्हा हे साप कोंबडीच्या पिलांवर हल्ला करतात. तेव्हा ती आपल्या चोचीने सापांचा हल्ला परतवून लावते आहे. ती सापांवर आपल्या चोचीच्या साहाय्याने हल्ला करताना दिसत आहे. कसोशीने प्रयत्न करुन ही कोबंडी हिम्मत आणि प्रेमाच्या जोरावर आपल्या पिलांना सापांच्या तावडीतून सोवडत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान हा व्हिडीओ जंगल बुक्स (The Jungle Books) नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक युजर्सना कोंबडीचे धैर्य़ आणि आपल्या पिलांप्रती तिचे असलेले प्रेम खूप आवडत आहे. या व्हिडीओला अनेकांनी कमेंट्स करुन शेअरसुद्धा केलेलं आहे.

इतर बातम्या :

Fact Check : UP पोलीस अधिकाऱ्याकडून भररस्त्यात तरुण-तरुणीच्या छातीत गोळी, व्हायरल व्हिडीओ मागील सत्य काय?

Photo : सुट्टी मिळण्यासाठी अशीही शक्कल, 37 दिवसात एकाच मुलीसोबत चार वेळा लग्न आणि 3 वेळा घटस्फोट

VIDEO | वाहतूक पोलिसांना शिव्या घालणारा 24 तासात वरमला, मुलुंडमधील तरुणाचा माफीनामा

(fight between Hen and Snake video goes viral on social media)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.