फोटोत दिसणाऱ्या कॉफीच्या मागे दडलंय एक रहस्य, जाणून घ्या नेमकं काय आहे?
कॉफीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कॉफीचं चित्र पाहून अनेकांचे अंदाज खोटे ठरत आहेत.त्यामुळे अनेकांनी फेरविचार करायला फोटोने भाग पाडलंय. हा फोटो पाहून अनेकांना हा ताज्या कॉफीचा काढलेला फोटो वाटत आहे. पण तसं नाहीये. या फोटो मागचं रहस्य वेगळं आहे.
मुंबई : कॉफी (Filter Coffee)नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगात तरतरी येते. कॉफीचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. हॉट कॉफी फिल्टर कॉफी असे वेगवेगळे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. गरमागरम वाफाळलेली कॉफी प्यायला कुणाला नाही आवडत? सकाळची फ्रेश सुरूवात करण्यासाठी, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी ऑफिसमधून घरी आल्यावर संध्याकाळीची कॉफी. असं दिवसातून कित्येकवेळा कॉफी घेतली जाते. याच कॉफीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral News) होत आहे. हे कॉफीचं चित्र (Painting) पाहून अनेकांचे अंदाज खोटे ठरत आहेत.त्यामुळे अनेकांनी फेरविचार करायला फोटोने भाग पाडलंय.
व्हायरल फोटो
कॉफीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कॉफीचं चित्र पाहून अनेकांचे अंदाज खोटे ठरत आहेत.त्यामुळे अनेकांनी फेरविचार करायला फोटोने भाग पाडलंय. हा फोटो पाहून अनेकांना हा ताज्या कॉफीचा काढलेला फोटो वाटत आहे. पण तसं नाहीये. या फोटो मागचं रहस्य वेगळं आहे. हा कॉफी फोटो पाहून तुमचा विश्वास बसणार नाही पण हा फोटो नसून ते चित्र आहे. जे एका कलाकाराने साकारलं आहे.
i painted filter coffee! ? pic.twitter.com/tmvMLoKVcb
— Varuna (@VforVendakka_) April 21, 2022
स्टीलच्या ग्लासमध्ये दिलेली फिल्टर कॉफी सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. ही फिल्टर कॉफी चेन्नईच्या एका कलाकाराने साकारली आहे. हे चित्रे सध्या नेटकऱ्यांना गोंधळात टाकत आहेत.ही फिल्टर कॉफी एक पेंटिंग आहे. पण या चित्राला एवढ्या उत्तमरित्या साकारलंय की ते पाहताना खरीखुरी कॉफी पाहत असल्याचा फील येतो.
हा फोटो वरूना नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला “मी कॉफीचं चित्र काढलंय”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या फोटोत स्टीलच्या कपात सर्व्ह केलेली कॉफी, न्यूजपेपर आणि कॉफी बिन्स पाहायला मिळत आहेत. याला 56 हजारांहून अधिकांनी लाईक केलंय.