मुंबई : देशात कमीवेळेत चांगलं काय खायला मिळतं असं जर कोणाला विचारलं, तर त्यांच्या तोंडात मॅगी (Viral news) हे नाव येईल. कमी कालावधीत मॅगा अधिक प्रसिध्दीस आली आहे. अनेकांना मॅगी (Maggi) आवडते, तर काही लोकांच्यासमोर मॅगीचं नाव जरी घेतलं तरी लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. फास्ट होत असलेला नाष्टा अनेकांना आवडतो. सध्याचा व्हिडीओ सोशस मीडियावर (Social media) चांगलाचं व्हायरल झाला आहे. 400 रुपयांना मॅगीची प्लेट असल्यामुळे अनेकांना किंमत ऐकून सुध्दा धक्का बसला आहे.
सध्या शहरात एक नवं डिश आलं आहे. त्याचबरोबर ती डिश सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल सुध्दा झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जी व्यक्ती मॅगी तयार करीत आहे, ती चारशे रुपयाला मिळत आहे. हे खरं आहे की, मॅगी चारशे रुपयाला मिळत आहे.
त्यासाठी, तुम्ही थोडासा विचार करा की, त्यामध्ये इतकं काय असेल ? दुकानात पाच, दहा, २० रुपयाला मिळणारी मॅगी ४ रुपयाला मिळत असल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. डिश तयार करण्यासाठी ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, त्यापैकी कोणत्याही गोष्टींचा आम्ही अजून उल्लेख केलेला नाही.
इंस्टाग्रामवरती एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बंटी मीट या व्यक्तीचं दुकान दिसत आहे. मॅगीची प्लेट इतकी का महाग आहे हे त्या विक्रेत्याने सांगितलं आहे. ती व्यक्ती मटणाने भरलेल्या कडईमध्ये मॅगी तयार करीत आहे. काही खास मसाला आणि भाजी टाकल्यानंतर, विक्रेता मटणामध्ये मॅगीचा एक तुकडा टाकत आहे. ‘बखरे के नखरे’ नावाचा हा व्हिडीओ तुम्हाला रडवेल किंवा नाराज करेल.
हा व्हिडीओ 4.9 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. ज्या लोकांना साधी मॅगी आवडते. त्या लोकांनी ही मॅगी अजिबात आवडली नसल्याचं सांगत आहे. त्याचबरोबर कमेंटमध्ये साधी मॅगी खाणाऱ्या लोकांनी वाईट कमेंट केल्या आहेत. काही लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे, कारण त्यामध्ये मटण मिक्स केलं आहे.