मुंबई : सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात भारतीय गाण्यावर परदेशात केलेला डान्स तर अनेकांच्या पसंतीला उतरतो. अश्यात जर तो मराठी गाण्यावरचा डान्स असेल तर तो व्हायरल व्हायला वेळ लाग नाही. असाच एक डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे आणि अनेकांची मनं जिंकत आहे. पॅरिसमधल्या जिका या डान्सरचा (Dancer Jika) एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो आपलीच हवा या मराठी गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. यात त्याच्यासोबत आणखी एक तरूणी दिसत आहे.
एक डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि अनेकांची मनं जिंकत आहे. पॅरिसमधल्या जिका या डान्सरचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो आपलीच हवा या मराठी गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. यात त्याच्यासोबत आणखी एक तरूणी दिसत आहे. हा व्हीडिओ जिकाने त्याच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केलाय. तर सहा हजारांहून जास्त लोकांनी याला लाईक केलंय.
या व्हीडिओमध्ये तो जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये डोळ्याला गॉगल लावून डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या सोबत आणखी एक तरूणीही पाहायला मिळत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा टॉप घातलाय अन् त्याला साजेसा चश्माही तिने घातला आहे. पण डान्स करता करता तिचा हा चश्मा पडतो. त्यामुळे जिकाने या व्हीडिओला मी तिचा चश्मा तोडला असं कॅप्शन दिलं आहे.
जिका त्याच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे. याआधीही त्याच्या डान्सचे व्हीडिओ चर्चेचा विषय ठरले होते. तो भारतीय डान्स प्रकार भरतनाट्यम करताना पाहायला मिळाला. पॅरिसमधल्या Jika या डान्सरने भरतनाट्यमचा डान्सचा व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओत jika पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये डान्स करतोय. त्यावरव त्याने चष्माही घातला आहे.त्याच्या या व्हीडिओत त्याचे दोन मित्रही त्याच्यासोबत पाहायला मिळत आहेत. एक मुलगी आणि दोन मुलं अश्या या तिघांचा डान्स तुफान व्हायरल होत आहे.