Kacha Badam Song dance video : सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम‘ या बंगाली गाण्याची लोकांची क्रेझ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आता परदेशातही लोक रील्स बनवून हे गाणे शेअर करत आहेत. हे गाणे कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायले नाही, तर भुबन बद्याकर नावाच्या व्यक्तीने गायले आहे, जो आपल्या दुचाकीवरून छोट्या-मोठ्या वस्तू विकतो. भुबन मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूमचा आहे. हे गाणे व्हायरल झाल्यानंतर भुबन रातोरात लोकप्रिय झाला आहे. आता सोशल मीडियावर (Soccial Media) धुमाकूळ घालणाऱ्या या गाण्यावर दोन परदेशी (Foreign) मुला आणि एका मुलीने जबरदस्त डान्स (Dance) केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की पॅरिसमधील (Paris) दोन मुले आणि एक मुलगी या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. गंमत म्हणजे त्यांना नाचताना ते कुठल्या बाहेरच्या देशातले आहेत, असे वाटत नाही. या गाण्याच्या लोकप्रिय हुक स्टेप्स त्याने खूप छान वाजवल्या आहेत.
गंमतीने सर्व लोक म्हणत आहेत, आता भुबन बद्याकर परदेशातही गेलाय. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खासकरून भारतीय या परदेशी मुला-मुलींचे कौतुक करत आहेत. कच्च्या बदामावरचा हा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर जिकामानु नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही भारतीयांना टॅग करत पॅरिसच्या जिका मनूने कॅप्शनमध्ये लिहिले, की तुम्ही मला हा ट्रेंड पाठवला आणि आम्ही तो पूर्ण केला. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूझर्सना खूप आवडला आहे. खासकरून हा व्हिडिओ पाहून भारतीय पॅरिसच्या या मुला-मुलींवर आपले प्रेम उधळत आहेत.
2 फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 62 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच वेळी, लोक सतत व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूझरने कमेंट करत लिहिले, की अरे व्वा, कच्चा बदाम आंतरराष्ट्रीय स्तरावर हिट झाला आहे. त्याचवेळी दुसरा यूझर म्हणतो, की तुम्ही लोकांनी कमाल केली आहे. प्रत्येक स्टेप चांगली केली आहे. दुसऱ्या यूझरने लिहिले ,की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला शुद्ध भारतीय व्हायब्स मिळत आहेत.’