मुंबई : सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. या ना त्या कारणामुळे व्हिडीओला प्रसिद्धी मिळत असते. मात्र यावेळी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रों यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत फ्रान्सचे राष्ट्रपती एका झटक्यात बियर रिचवताना दिसत आहेत. त्यांची ही कृती पाहून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. इमॅनुएल मॅक्रों टुलूज रग्बी खेळाडूंसोबत त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते. रग्बी स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर खेळाडूंसोबत जल्लोष केला. तसेच आनंदाच्या भरात एका झटक्यात बियर रिचवली. या व्हायरल व्हिडीओमुळे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रों वादात अडकू शकतात. दारू पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहान देत असल्याचा आरोप आता त्यांच्यावर होत आहे.
विजयी जल्लोष करणाऱ्या खेळाडूंची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती मॅक्रों तिथे आल्यानंतर त्यांना कोरोना बियरची बाटली दिली गेली. हातात बियर दिल्यानंतर उत्साहाच्या भरात इमॅनुएल मॅक्रों यांची एका दमात बियरची बाटली रिती केली. ही बॉटल रिकामी करण्यासाठी त्यांना फक्त 17 सेंकदाचा अवधी लागला. त्यांच्या या कृतीनंतर उपस्थित खेळाडूंनी एकच जल्लोष केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
? El presidente francés, Emmanuel Macron, se tragó una botella de cerveza después de que se lo tomaran a la ligera. Pero también hubo una razón: el final de la temporada en el Campeonato de Francia de Rugby, donde ganó el Stade Toulousian. pic.twitter.com/Hs2Ue4I5yh
— El Ojo de Jebus (@Chufl3t3r0) June 18, 2023
व्हायरल व्हिडीओननंतर विरोधकांनी राष्ट्रपती मॅक्रोंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रपती हे मोठं पद असून त्या पदाची लाज राखणं गरजेचं अशी टीका विरोधकांनी केली आहे. ग्रीन्स पार्टीचे खासदार सँड्रिन रुसो यांनीही ट्वीट करून निशाणा साधला. “राजकीय नेतृत्व आणि विषारी मदार्नगी एकच फोटोत” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
सोशल मीडियावर या व्हिडीओखाली कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी राष्ट्रपतींच्या कृतीचा निषेध केला आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, “राष्ट्रपती पदावर असलेल्या एका व्यक्तीने खुलेआमपणे दारू पिणे योग्य नाही. यामुळे चुकीचा संदेश जातो.” दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, “अशा कृतीमुळे देशाचं नाव बदनाम होतं. त्यामुळे राष्ट्रपतींनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा.”