भुवनेश्वर: मेस मधील जेवण कुणाकुणाला आवडतं? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय सांगाल? याचं उत्तर खूप सोपं आणि सगळ्यांकडून सारखंच येणारे. नाही! मेसचं जेवण कुणालाही आवडत नाही. तुमच्यापैकी अनेक लोकांना ही कल्पना असेल की घरचं जेवण नसेल तर काय होतं. सोशल मीडियावर सुद्धा अनेक लोक मेसच्या म्हणजेच खानावळीच्या जेवणाला नावं ठेवतात. यावर खूप मिम्स असतात. सिनेमामध्ये सुद्धा मेसच्या जेवणाची जाम खिल्ली उडवली जाते. हॉस्टेल, कॉलेज आणि मेस हे एक अनोखं नातं असतं नाही का? पण खरंच मेसचं जेवण असंच असतं का? त्याला खरंच काही चव नसते का?
सोशल मीडियावर खानावळीच्या जेवणाला खूप नावं ठेवली जातात. कधी कधी बातम्या सुद्धा असतात की अमुक-तमुक ठिकाणी जेवणात हे-ते आढळलं. हा फोटो बघा. हा फोटो इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेसचा आहे. हा फोटो खूप व्हायरल झालाय. इंजिअरिंगमध्ये जिथे पालक खूप पैसे भरून आपल्या पाल्याला शिकवतात, जिथे लाखो रुपये खर्च केले जातात तिथल्या मेसची ही अशी अवस्था आहे. काय वाटतं कसला फोटो असेल? अहो इथे चक्क जेवणात बेडूक आढळलाय.
This is KIT Bhubaneswar, ranked ~42 among engineering colleges in India, where parents pay approx 17.5 lakhs to get their child an engineering degree. This is the food being served at the college hostel.
Then we wonder why students from India migrate to other countries for… pic.twitter.com/QmPaz4mD82
— Aaraynsh (@aaraynsh) September 23, 2023
भुवनेश्वर मधल्या एका प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजमधला हा फोटो आहे. इथल्या हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या मुलाच्या जेवणात बेडूक आढळलाय. हा धक्कादायक प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा विद्यार्थ्यांनी याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. हे फोटो प्रचंड व्हायरल झालेत. समजा त्या मुलाला बेडूक दिसलाच नसता तर? बापरे! विचार सुद्धा करवत नाही. या फोटोवर अनेकांनी गंभीर प्रतिक्रिया दिलीये. विशेष म्हणजे हे इंजिनिअरिंग कॉलेज देशातील 42 नंबरचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे.