Video : खबरदार, मोबाइलला हात लावला तर! सोशल मीडियावर Viral होतायत ‘हे’ बेडूक!
अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतील, जे मजेदार आहेत आणि काही आश्चर्यकारक व्हिडिओदेखील आहेत, परंतु तुम्ही क्वचितच असा व्हिडिओ पाहिला असेल ज्यामध्ये बेडकां(frogs)चा एक गट मोबाइल फोनवर पहारा देत असेल.
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, की अनेक लोक काही मौल्यवान वस्तूंच्या रक्षणासाठी पहारेकरी वगैरे ठेवतात. हे अनेकदा चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं. हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत, ज्यामध्ये मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ नये, म्हणून त्याच्या रक्षणासाठी खूप गार्ड तैनात केले जातात, परंतु तुम्ही कोणी मोबाइल (Mobile) फोनवर पहारा देताना पाहिलं आहे का? सोशल मीडियावर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतील, जे मजेदार आहेत आणि काही आश्चर्यकारक व्हिडिओदेखील आहेत, परंतु तुम्ही क्वचितच असा व्हिडिओ पाहिला असेल ज्यामध्ये बेडकां(frogs)चा एक गट मोबाइल फोनवर पहारा देत असेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
बेडूक आक्रमक
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये चार बेडूक एका मोबाइल फोनच्या रक्षणात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. एक महिला त्यांच्या जवळ ठेवलेला मोबाइल घेण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तिचा हात मोबाइलजवळ येताच बेडूक सक्रिय होतात आणि आक्रमकपणे विरोध करतात. त्यानंतर महिला तिचा हात मागे घेते. यानंतर तिनं पुन्हा एकदा मोबाइल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु बेडूक तिला मोबाइल घेऊ देत नाहीत. एक वेळ अशी येते, की बेडूक महिलेच्या हातावर हल्ला करतं, त्यामुळे महिला घाबरते आणि हात मागे घेते. मग ती पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न करते, पण यावेळीही ती अपयशी ठरते. बेडूक तिच्यावर हल्ला करतात.
ट्विटरवर शेअर
असा व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @MorissaSchwartz या नावानं शेअर करण्यात आला आहे आणि ‘वे रानी के पहरेदारों से अधिक गंभीर हैं!’असं कॅप्शन लिहिलं आहे.
They’re more serious than the Queen’s guards! pic.twitter.com/odvSmT3fFx
— Morissa (Dr. Rissy) Schwartz (@MorissaSchwartz) January 20, 2022
गंमतीदार कमेंट्स
26 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 18 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं गंमतीत लिहिलंय, की हे कोणत्या प्रकारचे बेडूक आहेत?’, तर दुसऱ्या यूझरनं ‘फोनचं व्यसन इतर प्रजातींमध्येही पसरत आहे’, अशी टिप्पणी केली.