डिझेल पराठ्यापासून रजनीगंधा ऑमलेटपर्यंत, ‘या’ पदार्थांचे कॉम्बिनेशन पाहून तुमचंही डोकं चक्रावेल

हे पाहून नेटकऱ्यानी चांगलाच लक्षात ठेवलेलं आहे. चला तर मग पाहूयात अशाच काही फूड फ्यूजन्सवर जे पाहून लोकांचे डोकं चक्रावून गेले होते.

डिझेल पराठ्यापासून रजनीगंधा ऑमलेटपर्यंत, 'या' पदार्थांचे कॉम्बिनेशन पाहून तुमचंही डोकं चक्रावेल
food combination
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 3:33 PM

सोशल मीडियाच्या दुनियेत अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकजण अचंबित होतात. त्यामुळे अशा अजब गजब व्हिडीओंसाठी २०२४ हे वर्ष खास ठरलं. या वर्षात असे काही व्हिडीओ तुफान व्हायरल झालेत, ज्यात फूड कॉम्बिनेशनचा समावेश होता, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. ज्यामुळे काही जणांचे हे व्हिडीओ पाहून डोकं चक्रावून गेले होते. अशाच काही फूड फ्यूजन्सवर एक नजर टाकूया, पण 2024 हे वर्ष या फूड फ्यूजन्सच्या नावावर ठेवण्यात आले होते.

डिझेल पराठा

डिझेल पराठा कधी ऐकलं आहे का? नाही ना, तर २०२४ मध्ये म्हणजे यावर्षी सोशल मीडियावर डिझेल पराठा पहिल्या क्रमांकावर होता. चंदीगडमधील एका ढाब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये बबलू नावाच्या व्यक्तीने दावा केला आहे की, तो पराठे डिझेलमध्ये तळून सर्व्ह करतो. हे ऐकताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेकांनी या व्हिडिओवर भन्नाट कमेंट केल्या होत्या. मात्र ज्या फूड व्लॉगरने ही पोस्ट शेअर केली होती त्याने लगेचच हा व्हिडिओ डिलीट केला आणि ढाब्याच्या मालकाने पराठा बनवताना डिझेलचा वापर केला नसल्याचे स्पष्ट केले.

आईस्क्रीम पाव

आपल्या सर्वांचा मुंबईचा वडापाव हा जगभर प्रसिद्ध आहे. तुम्ही कधी वडापावऐवजी आईस्क्रीम पावचं नाव ऐकलं आहे का? आईस्क्रीम पावचं नाव ऐकून जरा विचित्र वाटेल. पण यावर्षी तुफान व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आईस्क्रीम पावमध्ये सर्व्ह केले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे फ्युजन पाहून लोकांनी अशा व्हिडिओवर खूप संताप व्यक्त केला.

मिसळ पिझ्झा

तुम्ही कधी पिझ्झा आणि मिसळ कॉम्बिनेशन खाल्लं आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका व्यक्तीने चक्क पिझ्झा आणि मिसळ असलेले कॉम्बिनेशन खाण्यास विकत आहे. तर पुण्यातील एका कॅफेने हे फ्युजन प्रत्यक्षात आणले. फरसाण, अंकुरलेली डाळ आणि मसाल्यांनी सजवलेल्या या ‘मिसळ पिझ्झा’ने पिझ्झाप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला. हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्यांनी याला ‘आपत्ती’ म्हटले आहे. अशी कमेंट केली आहे.

गुलाब जाम डोसा

आपल्यापैकी अनेकांचा डोसा हा आवडता पदार्थ आहे. तसेच डोशामध्ये वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्लेच असतील. तुम्हाला देखील माहीतच असेल की डोशाबरोबर फक्त बटाट्याची भाजी असते. परंतु असं तुम्हाला वाटत असेल तर चंदीगडच्या या फ्युजनबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल. एका व्यक्तीने चक्क गुलाब जाम डोसा बनवला आहे. डोश्याचा हा प्रकार पाहून लोकांना इतके आश्चर्यचकित वाटले की, व्हिडिओवर ‘नको आहे’ अशा कमेंट्स करण्यात आल्या.

पान मसाला ऑम्लेट

कोलकात्याच्या रस्त्यांवरून व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ऑमलेट बनवताना दिसत आहे. तुम्ही जर नीट पहिले तर हा व्यक्ती या ऑमलेट मध्ये पान मसाला पावडरचा वापर करून तयार करत आहे. या विचित्र पदार्थाने नेटकऱ्यांना विचार करायला भाग पाडले, शेवटी असे कोणी करते का? अश्या कमेंट्स करण्यात आलाय.

बिर्याणी फ्लेवर्ड आईस्क्रीम

२०२४ हे वर्ष बिर्याणी फ्लेवर्ड आईस्क्रीमसाठीही नेटकऱ्यांच्या स्मरणात राहील. कारण आपण अनेकदा व्हॅनिला आणि चॉकलेट आईस्क्रीम खातो. पण तुम्ही कधी बिर्याणीची चव असलेली आईस्क्रीम खाल्ली आहे का? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका पठ्ठ्याने चक्क दालचिनी आणि वेलचीचा वापर करून बिर्याणी चव असलेल्या आईस्क्रीम तयार केली आहे. हे विचित्र फूड कॉम्बिनेशन सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. हे फूड फ्यूजन २०२४ मध्ये सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले आहेत.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.