‘आजपासून हे पद तुमचे, जय श्री राम’, IIT बाबाला थेट सीईओ पदाची ऑफर, नुसती चर्चाच चर्चा
IIT Baba offered Post of CEO : 'मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. आजपासून हे पद तुमचे, रामराम, जय श्रीराम', या पोस्टने सध्या सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. टीम इंडियाने बाबाचे दात घशात घातल्यानंतर आता या पोस्टची एकच चर्चा होत आहे.

‘मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. आजपासून हे पद तुमचे, रामराम, जय श्रीराम’, या पोस्टची सध्या एकच चर्चा होत आहे. MBA चहावाला ब्रँडचा मालक प्रफुल्ल बिल्लोरे याने त्याच्या सोशल अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यावर कमेंटचा पाऊस पडला आहे. प्रफुल्ल सोशल मीडियावर काही ना काही अपडेट देत असतो. यावेळी त्याने मजेशीर पोस्ट केली आहे. टीम इंडियाने किती ही प्रयत्न केले तरी पाकिस्तानविरोधात ते सामना जिंकू शकणार नाही अशी भविष्यवाणी आयआयटी बाबा अभय सिंहने केली होती. टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चोरून बाबाचे दात घशात घातले. आता या पोस्टने पुन्हा धुमाकूळ घातला आहे.
प्रफुल्ल बिल्लोरे असे लिहिले तरी का?




सोशल मीडियावर प्रफुल्ल बिल्लोरे याने यापूर्वी ज्या संघाला पाठिंबा दिला. तो संघ सामना हारला आहे. याविषयीच्या चर्चा आणि बातम्या अनेकदा झाल्या आहेत. आपण ज्या संघाला पाठिंबा दिला, तो संघ हारल्याचे त्याने सांगितले. त्याने ज्या राजकीय पक्षाला पाठिंबा जाहीर केला, ते उमेदवार सुद्धा पडले. त्यामुळे प्रफुल्ल बिल्लोरे याने सोशल मीडियावर ज्या टीमला पाठिंबा दिला तर ती मॅच हरणार असा संदेश लगेच जातो, असे त्याचे म्हणणे आहे.
I have resigned recently from my job.
It’s All yours now !! Ram ram, Jay Shri Ram
#IITianBaba #INDvsPAK #ViratKohli𓃵 #ChampionsTrophy pic.twitter.com/jAgky6BzOS
— Prafull Billore (@pbillore141) February 23, 2025
पण यावेळी समाज माध्यमच नाही तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर आयआयटी बाबाच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली होती. आयआयटी बाबाचा भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी, विशेषतः विराट कोहली आणि रोहित शर्मा याने कितीही प्रयत्न केले तरी भारत सामना जिंकू शकणार नाही असे बाबा म्हणाले होते. त्यानंतर एकच गदारोळ उठला होता.
पण बाबाची भविष्यवाणी टीम इंडियाने गुंडाळलीच नाही तर तिचा पार इस्कोट केला. भारत जिंकल्यानंतर चाहत्यांनी, भारतीयांनी आयआयटी बाबावर तुफान टीका केली. त्यांच्यावर मीम्सचा, प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यामुळेच प्रफुल्ल बिल्लोरे यांनी आता बाबाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामागे ते पराभूत व्हावे अशी लपलेली इच्छा आहे.
गिरे तो भी टांग उपर
भारत-पाकिस्तान सामन्यावर भविष्यवाणी करणारे आयआयटी बाबा अभय सिंह यांच्यावर सामन्यानंतर भारतीय तुटून पडले. ते ट्रोल झाले. टीम इंडिया जिंकल्यानंतर आयआयटी बाबाने पण प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी अगोदरच्या भविष्यवाणीविषयी मत जाहीर केले. कोणी पण कोणत्याच भविष्यवाणीवर विश्वास ठेऊ नका असा आपल्याला संदेश द्यायचा होता अशी सारवासारव बाबांनी नंतर केली.