दोघात तिसरा, आता पैसे विसरा…; पेट्रोल पंपावर असा काय लोचा होतो? पाहा Funny Video

Funny video : सोशल मीडियावर विनोदी (Comedy) व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात. दुकानदाराने ग्राहकाला फसवले किंवा ग्राहकाने दुकानदाराला टोपी घातली, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दोघात तिसरा, आता पैसे विसरा...; पेट्रोल पंपावर असा काय लोचा होतो? पाहा Funny Video
पेट्रोल पंपावर होतो लोचाImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 8:30 AM

Funny video : सोशल मीडियावर विनोदी (Comedy) व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात. दुकानदाराने ग्राहकाला फसवले किंवा ग्राहकाने दुकानदाराला टोपी घातली, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत असतात. कधीकधी ग्राहक आणि दुकानदारात योग्य संवाद होत नाही. एकमेकांपर्यंत ते योग्यप्रकारे पोहोचत नाही आणि मग याचा फायदा दोघांपैकी एकाला नक्की होतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पेट्रोल पंपावरचा हा व्हिडिओ आहे. एक ग्राहक पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावर जातो पण पैसे देतो की नाही, हे कोडे या व्हिडिओमध्ये दडले आहे. पेट्रोल पंपावरचा कर्मचारी काय सांगतो आणि ग्राहक काय करतो, याची धमाल या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. यूझर्सनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाइक केले आहे.

तिसऱ्यालाच फायदा

व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल, की एका बाइकवर एक व्यक्ती पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावर येतो. तिथल्या कर्मचाऱ्याला तो म्हणतो, की पाच लिटर पेट्रोल टाक. मग तोही पाच लिटर पेट्रोल टाकतो. मग पैसे द्यायला तो पाकिट काढतो, तर तो कर्मचारी म्हणतो, पैस मला नको, शेजारच्या पंपावर दे. माझा थोडा प्रॉब्लेम झाला होता. मग तो दुचाकीस्वार त्या दुसऱ्या ठिकाणी जातो. त्यावेळी दोन कर्मचाऱ्यांचा संवाद होतो आणि त्याचा फायदा हा दुचाकीस्वार उचलतो.

यूट्यूबवर अपलोड

हा मजेशीर व्हिडिओ यूट्यूबवर विकास वर्मा (Vikas verma) या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. 12 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 250,704+ व्ह्यूज आहेत. त्यातही वाढ होत आहे. यावर यूझर्स लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. ‘Petrol pump per locha Ho Gaya‘ अशी मजेशीर कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आली आहे.

आणखी वाचा :

Viral : स्विमिंग पूल, हेलिपॅडसह काय काय सुविधा आहेत ‘या’ कारमध्ये? पाहा, जगातली सर्वात लांब कार

Video : एवढ्या लहान वयात इतकं डोकं चालतं तरी कसं? कपड्याची घडी घालण्यासाठी काय Jugaad केला? पाहा…

सैरभैर झालेल्या अस्वलानं केला हल्ला, Circusमधला ‘हा’ धक्कादायक Viral video पाहा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.