Funny Dog Race : सोशल मीडिया(Social Media)वर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral) होतात, पण त्यातील काही मोजकेच असे असतात, की आपलं मनोरंजन (Entertain) करतात. आपण असे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहतो. यामध्ये प्राण्यांच्या व्हिडिओंचाही समावेश आहे. सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या प्राण्यांचे व्हिडिओ पाहायला मिळत असले, तरी ज्या प्राण्याचे व्हिडिओ सर्वात जास्त शेअर केले जातात, तो म्हणजे कुत्रा… त्याचे व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. बहुतेक लोकांना मजेदार व्हिडिओ अधिक आवडतात, जे पाहून ते हसतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुत्र्यांची शर्यत सुरू आहे, पण शर्यत सुरू होताच कुत्र्यांना त्या शर्यतीत काहीच स्वारस्य नाही, ते इकडे तिकडे धावू लागतात. हे पाहताना आपलं मात्र मनोरंजन होतं.
कुत्र्यांमध्ये शर्यतीचा जोश, पण…
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कुत्र्यांची शर्यत पाहण्यासाठी अनेक लोक जमले आहेत आणि जल्लोष करत आहेत. यानंतर शर्यत सुरू होताच कुत्रे इकडे तिकडे धावू लागतात. काही रेस पॉइंटवर थांबतात आणि काही आजूबाजूला पळतात. यावेळी दोन कुत्र्यांमध्ये शर्यतीचा जोश दिसत असला, तरी काही अंतर गेल्यावर त्यांची उत्कटताही उफाळून येते. ते हाफवे पॉइंटपासून रेस पॉइंटवर परत येऊ लागतात. त्यानंतर, कुत्रे इकडून तिकडे त्याच रेस पॉइंटवर बराच वेळ धावतात. मग अचानक दोन कुत्रे पुढे पळायला लागतात आणि त्यातील एक शेवटी शर्यत जिंकतो. मात्र, ही शर्यत ज्याप्रकारे झाली, इतकी मजेशीर शर्यत तुम्ही यापूर्वी क्वचितच पाहिली असेल.
Corgi chaos.. ? pic.twitter.com/VmnbrMh770
— Buitengebieden (@buitengebieden_) January 25, 2022
ट्विटरवर शेअर
हा मजेदार व्हिडिओ @buitengebieden_ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 12 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक केलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.