मांजराने सापाला केले घायाळ; दोघांमधील झुंज पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
साप म्हटलं की बापरे अशी स्वाभाविक प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडून बाहेर येते. सापाविषयी प्रत्येकाच्या मनात असलेली भीती त्यातून व्यक्त होते.
सोशल मीडियामध्ये सध्या प्राण्यांचे व्हिडिओ फार लोकप्रिय ठरत आहेत. त्यातही पाळीव प्राण्यांच्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. अनेकदा सोशल मीडियातील युजर्स जंगलातील प्राण्यांचे थरार दाखवणारे व्हिडिओ पोस्ट करतात, तर काही युजर्स त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांच्या ऍक्टिव्हिटीज दाखवून लोकांची करमणूक करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral on Social Media) केला जात आहे. हा व्हिडिओ आहे साप (Snake) आणि मांजर (Cat) यांच्यातील संघर्षाचा.
साप म्हटलं की बापरे अशी स्वाभाविक प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडून बाहेर येते. सापाविषयी प्रत्येकाच्या मनात असलेली भीती त्यातून व्यक्त होते. साप आणि मुंगूस तसेच साप आणि मांजर यांच्यातील वैर किती कट्टर असते, याची प्रचिती अनेकांना आलेली असेलच.
वायरल व्हिडिओमध्ये साप आणि मांजर यांच्यामध्ये काही क्षण सुरू असलेला संघर्ष दिसत आहे. सापाला बरेच प्राणी घाबरतात, मात्र व्हिडिओतील मांजर न घाबरता सापाशी दोन हात करताना दिसतेय. त्यामुळे हा व्हिडिओ अनेकांना प्रचंड आवडला असून तितकाच शेअर केला जात आहे.
Snakes, cats, fights, video viral, social media
मांजरामध्ये एवढी हिंमत आली तरी कोठून?
व्हायरल झालेला व्हिडिओ हा एका इमारतीच्या कोपऱ्यातील आहे. सापाने एका बाजूला आपला मोर्चा वळवला आहे. तो कुठल्यातरी बिळात घुसण्याच्या बेतात आहे, तितक्यातच मांजर त्याला डिवचते. शेवटी साप तो. स्वस्थ कसा राहील? त्यानेही मांजराशी झुंज देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.
साप खरंतर विषारी प्राणी. तो मांजराला दंश करून जीवे मारू शकला असता. पण बेधडक, बिनधास्त मांजराने सापाच्या मनात असा विचारही आणू दिला नाही.
मांजराच्या वारंवारच्या हल्ल्यापुढे साप जणू गर्भगळीत झाला आहे. तो स्वतःमधील हल्ल्याची क्षमता जणू हरवून बसला आहे. तो केवळ मांजरासमोर हल्ल्याची हूल देतोय. पण त्याच्या या दहशतीपुढे मांजर नरमलेली नाही.
मांजरीने जशास तसे हल्ले सुरू ठेवत सापाचा बँड वाजवला आहे. त्यामुळेच सोशल मीडियातील व्हिडिओ प्रचंड लोकप्रियता कमावत आहे. मांजराची हीच धमक सोशल मीडियामध्ये कौतुकाचा विषय ठरली आहे. अनेक लोक पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहत आहे.
संघर्षात सापानेच मानली हार
मांजराने सापाच्या हल्ल्यांचा इतका निकराने प्रतिकार केला ती काही क्षणांतच सापाने हार मानली. मांजर ही वाघाची मावशी मानली जाते. याची प्रचिती सापाला आलेली दिसते. त्यामुळेच मांजरापुढे सापाने हार मानून प्रतिकार करणे सोडून दिले आहे. तो वेटोळे करून शांत बसला आहे.