एसटी चालकाच्या एका हातात छत्री, दुसऱ्या हातात स्टेअरिंग, प्रवाशांचा जीव टांगणीला

गडचिरोली जिल्ह्यातील एक एसटीचा व्हिडीओ चांगलाचं सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एसटी चालकाच्या हातात स्टेरिंग ऐवजी छत्री असल्यामुळे जाब कुणाला विचारायचा असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

एसटी चालकाच्या एका हातात छत्री, दुसऱ्या हातात स्टेअरिंग, प्रवाशांचा जीव टांगणीला
Gadchiroli St Bus Video Viral on social mediaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 12:38 PM

गडचिरोली : महाराष्ट्रात (Maharashtra ST news) अनेक जिल्ह्यात भंगारातील एसटी (St Viral News) चालवत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे पावसाळा सुरु झाल्यापासून एसटी बसमध्ये अनेकदा बिघाड झाला आहे. विशेष म्हणजे त्याचे व्हिडीओ सुध्दा सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत. सांगली आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक व्हिडीओ संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरला होता. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Gadchiroli St Bus Video Viral on social media) चांगलाचं व्हायरल झाला आहे. एसटीची बस गळत असल्यामुळे एसटी चालकाने आपली अंगावर छत्री पकडली आहे. एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात स्टेअरिंग अशी एसटी चालवली असल्याची व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवाशांनी सरकारवरती चौफेर टीका केली आहे.

चालक छत्री हातात पकडून बस चालवतोय

गडचिरोलीच्या अहेरी आगारातील छप्पर उडालेल्या बसचा यापूर्वी सुध्दा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका हातात स्टेरिंग आणि एका हातात वायफर फिरवत असलेला बसचा व्हिडिओ राज्यात सगळीकडं पाहायला मिळाला. त्याच आगाराचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. पाऊस सुरू असताना बसमध्ये छत गळत असल्याने चक्क चालक बसमध्ये छत्री घेऊन बसला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या नव्या व्हिडिओमुळे अहेरी आगारातील भंगार बसगाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.

हे सुद्धा वाचा

असे अनेक प्रकार अहेरी आगारात घडत सुद्धा राज्य सरकार मात्र या आगाराला नवीन बस गड्यात पुरवण्यात दीरंगाई करीत असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असल्याचं प्रवासी सांगत आहेत. एकीकडे राजकीय मंडळी गडचिरोलीत विमानतळ उभारण्याच्या बाता करत असल्या तरी गडचिरोलीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात एसटीच्या आगारात बस गाड्यांची दयनीय अवस्था आहे. एसटी नेहमी वेगळे किंवा अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्याचा व्हिडीओ सुध्दा चांगलाचं व्हायरल झाला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.