Tabla funny video : सोशल मीडियावर (Social media) हास्य, विनोदाचे, खट्याळ (Funny) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. ते पाहत असताना जे ज्यांनी तयार केलेत, त्यांच्या क्रिएटिव्हीटीला (Creativity) पाहून आपणही क्षणभर बुचकळ्यात पडतो. कोणताही एखादा विषय घेऊन त्यावर व्हिडिओ तयार करणं म्हटलं तर खूप सोपं किंवा खूप कठीण असतं. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तबला वाजवणाऱ्या दोघांचा हा व्हिडिओ आहे. त्यात त्यांनी ज्या स्टाइलनं तबला वाजवलाय, तो पाहून तुम्हाला आश्चर्यही वाटेल आणि हसूही येईल. सोशल मीडियावर असे संगीत वाद्यांशी संबंधित व्हिडिओ आपल्याला खूप व्हायरल झालेले पाहायला मिळतात. त्याचप्रकारातला हाही व्हिडिओ असून तो चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहणाऱ्याला हसवणे, हाच या कलाकारांचा उद्देश असल्याचं आपल्याला व्हिडिओ पाहून कळतं.
या व्हिडिओत दोघेजण तबला वाजवणारे कलाकार आपल्याला दिसतात. त्यातला एकजण तबला वाजवत असतो. तर दुसरा आपलं मनोरंजन करत असतो. पण मनोरंजन करण्यासाठी त्यानं जरा वेगळा मार्ग निवडलाय. आपल्याकडे गायछाप हा शब्द खूप प्रसिद्ध आहे. हा शब्द विनोदी अर्थानंही खूपवेळा वापरला जातो. तसाच इथंही वापरला गेलाय. तबला वाजवणाऱ्या साथीदारासह दुसरा कलाकार गायछापच्या स्टाइलनं विविध हालचाली करतो. या दोघांचीही कलाकारी पाहताना आपल्याला मात्र हसायला येतं.
यूट्यूबवर मीडिया मराठी (Media Marathi) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 23 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला पाच हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात सातत्यानं वाढच होत आहे. तर ‘अशी गायछाप ढोलकी तुम्ही कधी पाहिली आहे का, बघा हा अतरंगी व्हिडिओ’ असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय. कमेंट्सही मजेशीर आहेत. एकानं म्हटलंय, अबे ती ढोलकी हाय का?, तर आणखी एकानं म्हटलंय, की कौशल्यपूर्ण ढोलकी वादन… (Video courtesy – Media Marathi)