मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) गणपती महोत्सव (Ganeshotsav 2022) उत्साहात साजरा केला जातो. तसेच प्रत्येकवर्षी महाराष्ट्रात बाप्पाची विविध रुपे मुर्तीच्या रुपात पाहायला मिळतात. देशात अनेक ठिकाणी गणोशोत्सव उत्साहात साजरा होतो. हैदराबादला सुध्दा खूप मोठे गणपती पाहायला मिळतात. यंदा पुष्पा अवतार असलेल्या अनेक गणेश मुर्ती बाजारात अधिक आहेत. त्यामुळे गणेश मंडळांनी पुष्पा मुर्तीला अधिक प्राधान्य दिले आहे. सध्या लोअर परेल (Lower Parel) स्थानकात बाप्पा बसल्याचं चित्र तुम्हाला दिसत आहे.
जे खऱ्या अर्थाने मुंबईची भूक भागवतात, अंगात पांढरा सदरा, पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी घालून आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या घरचं जेवण खाऊ घालतात ते म्हणजे ” मुंबईचे डब्बेवाले “. यावेळेस बाप्पाने त्याचं रूप घेतलेलं आहे. आपली सुखाची, समाधानाची आणि चैतन्याची भूक तो भागवणार आहे.. बोला गणपती बाप्पा…
मुंबईचा डबेवाला ही संकल्पना : कविता पाटील, मूर्तिकार : शार्दूल सावंत, लेखन: कुणाल पवार, कला दिग्दर्शक : केतन दुदवडकर, सहाय्यक कला दिग्दर्शक : प्रसाद कळसकर , नियती कांबळे, चित्रकार : जमशेद, छाया चित्रण : चिन्मय जाधव, प्रकाश योजना : सिदधेश वाडेकर, ओमकार पवार, निमंत्रक : करण पाटील आणि पाटील परिवार, स्थळ: शक्ती पार्क डिलाई रोड परिसरात हा देखावा तयार करण्यात आला आहे.
तयार करण्यात आलेला हा देखावा अनेकांच्या पसंतीला पडला आहे. तसेच देखाव्याचा फोटो देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिथं अनेक भक्त भेट देत आहेत. त्याचबरोबर लोक व्हिडीओ काढून सोशल मीडियावरती शेअर करीत आहेत.