गौतम अदानी दारोदारी जावून अशा वस्तू विकायचे, शून्यापासून निर्मिती करणाऱ्या गौतम अदानी यांची कहाणी

गौतम अदानी यांनी आपल्या व्यवसायासाठी लक्ष्य ठेवले ते सर्वसामान्य लोकांना लागणाऱ्या गोष्टी. थर्मल पॉवर, अॅग्रो प्रोडक्ट्समध्ये गुंतवणूक आशा अनेक गोष्टींसाठी त्यांनी गुंतवणूक केल्याचे दिसून येते.

गौतम अदानी दारोदारी जावून अशा वस्तू विकायचे, शून्यापासून निर्मिती करणाऱ्या गौतम अदानी यांची कहाणी
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 10:53 PM

मुंबईः आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गौतम अदानी सध्या चर्चेत आहेत. मात्र त्यांच्या या श्रीमंतीपणाला अमेरिकी रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपला मात्र मोठा धक्का दिला आहे. सध्या जोरदार चर्चा आहे ती अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्स पडल्यामुळे.गौतम अदानी यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कित्येक अब्ज डॉलरचा व्यवसाय उभारला आहे. स्वतः कॉलेज ड्रॉप-आऊट गौतमी अदानी आज लाखो लोकांना रोजगाराच्या संधी देत आहेत.

तर पोर्ट, एनर्जी, लॉजिस्टिक्स, अॅग्री बिजनेस, रिअल इस्टेट, एअरपोर्ट्स, नॅच्यरल गॅस अशा एनक ना अनेक क्षेत्रात त्यांचा प्रचंड मोठा दबदबा आहे.

गौतमी अदानी यांची आजची श्रीमंती दिसत असली तरी त्यांनी सोळाव्या वर्षापासून घरोघरो जाऊन कपडे, साड्या विकत होते. अहमदाबादच्या जुन्या शहरातआजही अदानी टेक्सटाईल्सची दुकानं दिसून येतात.

त्याकाळी गौतम अदानी यांचे वडील ते दुकान चालवत होते.त्याचवेळी गौतमी अदानी यांनी आपल्या वडिलांना मदत म्हणून त्यांनी सायकलवरून साड्या विकण्यास सुरुवात केली.

गौतम अदानी जेव्हा सायकलवरून साड्या विकत होते, त्यावेळी त्यांची भेट मलय महादेविया यांच्याबरोबर झाली. त्यावेळी त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते दोघं आजही एकत्र काम करतात. त्याकाळात अहमदाबादमध्ये हवं तसं यश मिळत नसल्याने नंतर त्यांनी थेट मुंबईमध्ये येऊन दाखल झाले.

आपल्या भावासोबत फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी म्हणून त्यांनी 1988 मध्ये अदानी इंटरप्रायजेजचा पाय रचला होता. त्यानंतर त्यांनी एक्सपोर्ट-इम्पोर्ट कंपनीद्वारे व्यवसाय क्षेत्रात आपले पाऊल ठेवले.

नव्या व्यवसाय क्षेत्रात पाय ठेवल्यानंतर मात्र 1990 पासून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. तर 1995 मध्ये अदानी यांना गुजरातच्या मुंद्रा पोर्टचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, आणि हेच कॉन्ट्रॅक्ट अदानी यांच्यासाठी पुढील आयुष्यासाठी महत्वाचं ठरलं.

गौतम अदानी यांनी आपल्या व्यवसायासाठी लक्ष्य ठेवले ते सर्वसामान्य लोकांना लागणाऱ्या गोष्टी. थर्मल पॉवर, नॅच्यरल गॅस, अॅग्रो प्रोडक्ट्समध्ये गुंतवणूक आशा अनेक गोष्टींसाठी त्यांनी गुंतवणूक केल्याचे दिसून येते.

त्याशिवाय फॉर्च्यून तेल, सोयाबीन, रिफाइन अशा दररोज लागणाऱ्या वस्तू त्यांची कंपनी विल्मर तयार करते. त्यांनी रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्टक्चरसारख्या सेक्टरमध्येही प्रवेश केला आणि त्याचीही दिशा बदलून टाकली.

त्यांच्या वेगवेगळ्या उद्योगातील यशामुळेच आज देशातील 7 सर्वात मोठी विमानतळं अदानी ग्रुपकडे असल्याचे दिसून येते. अदानी इंटरप्राइज लिमिटेड गुवाहाटी, जयपूर, मंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, तिरुवनंतपुरम विमानतळांची देखरेख त्यांच्याकडेच येते.

गौतम अदानी गुजरात, दिल्ली, गुडगावसारख्या शहरांत त्यांची घरं आहेत. तर सध्या अदानी आपल्या कुटुंबासह अहमदाबादमध्ये राहतात. तर यांना मिळालेले हे यश त्यांना केवळ 30 ते 35 वर्षांमध्ये मिळवून त्यांनी यशाचे शिखर पादक्रांत केले आहे. कधी काळी सायकलवरुन घरोघरी फिरणारे गौतम अदानी आज लक्झरी कार्स, प्रायव्हेट जेटचे मालक असल्याचेही लक्षात येते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.