गौतमीचं ते वाक्य चाहत्यांच्या जिव्हारी, घायाळ चाहते म्हणाले नाही, नाही, हे शक्यच नाही
गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती चाहत्यांना म्हणते बाकीचे पोरं माझ्या भावावानी...
Gautami Patil dance video viral : महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या (Gautami Patil ) डान्सची मोठी चर्चा आहे. गौतमी पाटीलचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल (video viral) होत आहेत. तिचे काही व्हिडीओ हे वादग्रस्त ठरले असून तिच्या डान्समधील स्टेप्सवर अनेक जणांनी टीका देखील केली. त्यानंतर गौतमी पाटीलने व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.
सध्या असाच एक गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गौतमी पाटील ही स्टेजवर डान्स करत असताना चाहत्यांना म्हणते बाकीचे पोरं माझ्या भावावानी. त्याच वेळी खाली डान्स पाहण्यासाठी आलेले चाहते तिला उत्तर देतात.
View this post on Instagram
गौतमी पाटीलचे मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. तिच्या कार्यक्रमांना देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गौतमीने सर्वात जास्त कार्यक्रम हे पुण्यात केले आहेत. त्या ठिकाणी तिला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद आणि प्रेम मिळाल्याचं ती सांगत असते.
सांगलीमध्ये देखील गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती. गौतमी पाटील स्टेजवर येताच चाहते उठून नाचायला लागले. गौतमी पाटीलने ही मोठी गर्दी पाहून ती शेजारी असलेल्या ट्रकमध्ये जाऊन बसली. या वेळी पोलिसांना देखील चाहत्यांना आवरणे आवघड झालं. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी गौतमीला ट्रकमधून पोलिस स्टेशनमध्ये लपून जावं लागलं.