शेतकरी आंदोलनात महिलेचा सँडल चोरीला, लोकांकडून सीबीआय चौकशीची मागणी, तुफान मीम्स आणि जोक्सचा पाऊस

एका महिला शेतकरी नेत्याचा सँडल गायब झाल्यानंतर तिने सरकार आणि पोलिसांवर आरोप केले. ह्याच आरोपांना घेऊन सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाला आहे.

शेतकरी आंदोलनात महिलेचा सँडल चोरीला, लोकांकडून सीबीआय चौकशीची मागणी, तुफान मीम्स आणि जोक्सचा पाऊस
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 4:04 PM

नवी दिल्ली :  सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल, हे काही सांगता येत नाही. कोणत्याही वेळी कोणत्याही युझर्सने आपलं एखादं म्हणणं मांडावं आणि ते काही लोकांना पसंत पडावं. झालंच तर मग… त्यापाठीमागून अनेक लोक त्या विषयांवर वेगवेगळे ट्विट करतात, तश्या पोस्ट शेअर करतात. आताही असाच प्रकार पाहायला मिळतोय. एका महिला शेतकरी नेत्याचा आंदोलनादरम्यान सँडल गायब झाल्यानंतर तिने सरकार आणि पोलिसांवर आरोप केले. ह्याच आरोपांना घेऊन सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाला आहे. (Geeta Bhati ka sandal Wapas karo memes And jokes trending Social Media)

सोशल मीडियावर महिला शेतकरी नेत्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या या महिला नेत्या गीता भाटीचा सँडल गायब झाला आहे. त्यानंतर गीता भाटीने सरकार आणि पोलिसांवर आरोप करताना म्हटलं आहे, “सरकार आणि पोलिसांनी दोघांनी मिळून माझा सँडल गायब केला आहे. त्यांनी तो लवकरात लवकर मला परत करावा”. गीता भाटीच्या हास्यास्पद आरोपानंतर ट्विटरवरील युझर्सने #’गीता भाटी का सँडल वापस करो’ नावाने ट्रेंड केला आहे.

“सरकार आणि पोलिसांनी दोघांनी मिळून माझा सँडल गायब केला आहे. त्यांनी तो लवकरात लवकर मला परत करावा”, अशा आशयाचं गीताचं ट्विट युझर्सने जोरदार व्हायरल केलं आहे. तसंच ते व्हायरल करताना त्याच्यावर जोक्स आणि मिम्स बनवले आहेत. हेच जोक्स आणि मिम्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होतायत. अनेकांना यामुळे हसू अनावर होतंय.

एका युझर्सने ट्विट करत म्हटलं आहे की, “चोरी झालेला सँडल शोधण्यासाठी एनआयईची टीम संशयास्पद लोकांची यादी तयार करण्यात व्यस्त आहे. त्यासाठी थोडा वेळ लागेल. तर दुसऱ्या युझर्सने पूजा भाटीला शालजोडीतून टोमणा लगावताना म्हटलं आहे, “पूजा भाटीचा सँडल चोरीचा प्रश्न हा जागतिक मुद्दा आहे. तो आता जागतिक स्तरावर चर्चेला जाणार आहे. त्यावर जगभरातून आवाज उठेल”. तर तिसऱ्या युझर्सने म्हटलंय, “आमची तर स्पेशल मागणी आहे की या विषयी सीबीआयकडून सविस्तर चौकशी केली जावी”.

(Geeta Bhati ka sandal Wapas karo memes And jokes trending Social Media)

संबंधित बातम्या

Sunglass Trend | चेहऱ्यानुसार वापरा गॉगल्स, कोणत्या चेहऱ्यासाठी कोणता ट्रेंड?

Photo : रेट्रो इज इन द ट्रेंड, पाहा सोनाली कुलकर्णीचा रेट्रो अंदाज

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.