मुंबई : शेतकऱ्यांना (Farmer) अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत अतिमुसळधार पाऊस (heavy rain), अवकाळी पाऊस, कीटक नाशक, अवकाळी पाऊस अशा गोष्टीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींपासून आपल्या पीकांची शेतकरी काळजी घेत असतो. शेती करणं कुणाचंही काम नाही. सध्या शेतात अनेक प्राणी (Animal video) दिसत असल्यामुळे शेतकरी घाबरला आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांवर प्राण्यांनी हल्ला केला आहे. त्यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या एक मगरीला व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ (Shocking Viral Video) पाहिलेल्या लोकांना मोठा धक्का बसला आहे.
शेतात तुम्हाला अधिकतर साप आणि मासे पाहायला मिळतात. काहीवेळेला विषारी सापाने शेतकऱ्यांना चावल्यामुळे मृत्यू देखील झाला आहे. सध्या शेतातील एक डेंजर व्हिडीओ उजेडात आला आहे. हा व्हिडीओ डेंजर असल्यामुळे नेटकरी त्यावर कमेंट करीत आहेत. भली मोठी मगर तिथं अचानक एका हार्वेस्टर मशीनवर हल्ला करीत आहे. हा व्हिडीओ लूसियाना येथील असल्याचा सोशल मीडियावर दावा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर या व्हिडीओ अधिक लक्ष खेचलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर करण्यात आहे. ट्विटरवरती हा व्हिडीओ @TerrifyingNatur या नावाच्या अकाऊंटवरती शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक शेतकरी पाण्याने भरलेल्या शेतात हारवेस्टर मशीन चालवत आहे. त्यावेळी एका खतरनाक मगरीने हल्ला केला आहे.
Farming in Louisiana is tough. pic.twitter.com/2HjLO8exn1
— Terrifying Nature (@TerrifyingNatur) April 17, 2023
मगर शेतात लपून बसलेली आहे, त्याचवेळी हारवेस्टर मशीन पाहून मगरीच्या अंगावरुन जात असते. ज्यावेळी मगरीला मशीनचा स्पर्श झाला आहे. तेव्हा मगरीने तात्काळ त्यावर हल्ला केला. हा व्हिडीओ आतापर्यंत 6 मिलियन लोकांनी पाहिला आहे. 79 हजार लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी शेतकऱ्यांना अधिक मुश्कील काम म्हणतं आहे.