…म्हणून एकावेळी एकच काम करावं, नाहीतर ‘या’ मुलीसारखं हसं होतं; Treadmill video viral

Fell on Treadmill : एक मजेदार (Funny) व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि दोन गोष्टी एकत्र केल्याने काय परिणाम होऊ शकतात, हे देखील तुम्हाला शिकायला मिळेल.

...म्हणून एकावेळी एकच काम करावं, नाहीतर 'या' मुलीसारखं हसं होतं; Treadmill video viral
Treadmill करताना बोलत होती, अचानक गेला तोल
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 1:15 PM

Fell on Treadmill : एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकणारे लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. मात्र त्यासाठी सराव गरजेचा असतो. अन्यथा त्यामुळे नुकसानही होऊ शकते. असे करणारे लोक खूप हुशार असतात, असे आपण मानतो. आपल्याला चांगलंच माहीत आहे की मेंदूला एकावेळी एकापेक्षा जास्त कामांवर लक्ष केंद्रित करण्यात खूप अडचण येते. तुम्ही फक्त मोबाइल घ्या. तुमच्या लक्षात येईल, की जर तुम्ही फोनवर कोणाशी बोलत असाल तर त्याच्यासोबत इतर कोणतेही काम करण्यात अडचण येते आणि अशा परिस्थितीत कोणतेही काम नीट न होण्याची शक्यता जास्त असते. आता अशाच प्रकारचा एक मजेदार (Funny) व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि दोन गोष्टी एकत्र केल्याने काय परिणाम होऊ शकतात, हे देखील तुम्हाला शिकायला मिळेल.

तोल गेला

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की काही मुली जिममध्ये ट्रेडमिल मशीनवर चालत आहेत आणि मशीनचा वेगही जास्त आहे. या दोन मुली ट्रेडमिलवर चालताना बोलतही आहेत. सहसा ट्रेडमिलवर चालताना समोरचे हँडल धरावे लागते, जेणेकरून तोल बिघडू नये आणि तुम्ही पडू नये, पण एक मुलगी ही गोष्ट विसरते. ती बोलण्यात इतकी मग्न होते की ती ट्रेडमिलच्या हँडलवरून हात काढून घेते आणि हाताच्या इशार्‍याने समोरच्या मुलीला काहीतरी सांगू लागते. त्यानंतर तिचा तोल अचानक बिघडतो आणि ती पडते. मात्र, सुदैवाने तिला दुखापत झाली नाही आणि ती पुन्हा उठून ट्रेडमिलवर चालायला लागली.

ट्विटरवर शेअर

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, की एकावेळी एक गोष्ट करण्याचा धडा यामुळेच दिला जातो. अवघ्या 19 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइक करत विविध कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की सावधानाने हरवलेला अपघात झाला, तर दुसर्‍या यूझरने आता आपापसात बोलू नये, अशी मजेशीर कमेंट केली आहे.

आणखी वाचा :

Video : काळ आला होता, पण.., काही मिनिटं वाचवणं रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला पडलं महागात

पाणी पिता पिता बाटलीत अडकलं तोंड, बदलापुरातल्या ‘त्या’ बिबट्याच्या पिल्लाचा शोध सुरू

अभिनय असावा तर असा! पठ्ठ्या गाडीवर चढून लावतोय जोर, Funny video viral

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....