प्रियकराच्या घरी गेली, टॉयलेटमध्ये घुसली अन् सोशल मीडियावर लाइव्ह झाली; काय आहे हा विचित्र किस्सा?
Girl In Toilet : एक मुलगी तिच्या प्रियकराच्या घरी पोहोचली होती आणि तो मुलगा तिची त्याच्या आई-वडिलांशी ओळख करून देणार होता, पण तिथे काही वेगळाच किस्सा झाला.
Social Media Live : अनेक वेळेस जेव्हा एखादे कपल रिलेशनशिपमध्ये (couple in relationship) असते असतात तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबाला सरप्राईज द्यायचे असते. कधीकधी हे चांगले सरप्राइज ठरते मात्र कधी हे प्रकरण अगदी उलट होते. अशाच संदर्भात सोशल मीडिया(social media) वर चर्चा सुरू होती, मग एका केस स्टडीचा हवाला देत एका मुलाने आपल्या मैत्रिणीला घरी कसे बोलावले याचे उदाहरण दिले. त्याला तिची त्याच्या पालकांशी ओळख करून द्यायची होती पण तिथे काही वेगळाच किस्सा घडला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना थोडीशी जुनी आहे. पण अलीकडेच ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्याचे असे झाले की कॅनडामध्ये राहणाऱ्या एका जोडप्याला लग्न करायचे होते. मुलगी तिच्या प्रियकरासोबत बराच काळ लिव्ह-इनमध्ये होती, त्यानंतर अचानक एक दिवस ती प्रियकराच्या घरच्यांना भेटायला पोहोचली. मुलाने स्वतः सांगितले की त्याला तिच्या पालकांशी ओळख करून द्यायची आहे. मुलगी पोहोचली आणि घरच्यांना भेटलीही. पण थोड्या वेळाने ती टॉयलेट वापरण्यासाठी आत गेली.
जेव्हा मुलीला टॉयलेटचा फ्लश वापरायचा होता तेव्हा तो एकाच वेळी वापरता आला नाही. तो वापरण्यासाठी प्रयत्न करत असताता, त्यादरम्यान मुलीकडून तो फ्लश तुटला, त्यानंतर तिने (तो दुरुस्त करण्याचा) खूप प्रयत्न केला मात्र तिला त्यात अपयश आले. बाहेर आल्यावर कोणी विचारले तर काय सांगेल, याचे तिला टेन्शन आले. म्हणून तिन एक युक्ती केली. मुलीने टॉयलेटच्या आतून सोशल मीडियावर लाईव्ह (व्हिडीओ) केले आणि फ्लश तुटल्यावर काय करावेयाबबात लाइव्हवरच लोकांना सल्ला विचारला.
यानंतर काही लोकांनी तिची खिल्ली उडवली आणि टॉयलेटमधून लाइव्ह का केले असे विचारले. मात्र काही लोकांनी तिला धीर देत घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. मुलीचा लाइव्ह व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर सल्ले देण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, तुम्ही का घाबरत आहात, हे कुणासोबतही होऊ शकते. काहींनी तर मुलीला ट्रोल केले की ती लाइव्ह यायला नको होतं.