‘पापा की परी’चा नवा कारनामा, रेलिंगमध्ये अशी अडकली मुलगी, व्हिडीओ झाला व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्याला पाहून नेटिझन्सना हसू आवरत नाहीये. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगी रेलिंगच्या पार करून बाहेर येताना विचित्रपणे अडकल्याचे दिसत
Girl Funny Video : इंटरनेटवर एखादी गोष्ट कधी व्हायरल (social media) होईल याचा काहीच नेम नाही. यातील काही व्हिडीओ (video viral) धक्कादायक असतात, मात्र काही इमोशनल असतात. तर काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की ते पाहून आपला हसण्यावर कंट्रोलच रहात नाही. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामध्ये एक मुलगी अशा ‘विचित्र’ परिस्थितीत अडकलेली दिसत आहे की ते पाहून नेटिझन्स म्हणत आहेत- लो भैया, ये है पापा की परी का नया करनामा….
वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस जाण्यासाठी रेलिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामध्ये तिचे संपूर्ण शरीर तर बाहेर पडले पण तिचं डोकं त्या ग्रीलमध्ये अडकलं. ती मुलगी त्यातून डोक बाहेर काढण्यासाठी चिक्कार प्रयत्न करताना या व्हिडीओत दिसतंय, पण त्यात तिला अपयश आलं. तिचा हा प्रयत्न सुरू असताना एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर अपलोड केला, जो आता व्हायरल झाला आहे. खरतंर ही एक विचित्र परिस्थिती आहे, पण तो व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरतचं नाहीये.
View this post on Instagram
ashiq.billota या नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांपूर्वी अपलोड केलेल्या या क्लिपला अडीच हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. त्याचवेळी, कमेंट सेक्शनमध्ये लोक त्या मुलीची खूप मजा घेत आहेत. ‘ ती एक स्त्री आहे, ती काहीही करू शकते’, असे काहीजण म्हणतात. तर काहीजण यावर पापा की परी चा नवा कारनामा असल्याचे म्हणत आहेत.
एका युजरने तर भन्नाट कमेंट केली आहे. भगवान ने भेजा पर ‘भेजा’ देकर नहीं भेजा,( देवाने पृथ्वीवर पाठवलं पण भेजा (डोकं) नाही पाठवल) असा गमतीशीर मेसेज त्याने लिहीला आहे. तर दुसऱ्या युजरने तिला पापा की परी म्हणत तिचं डोकं ग्रिलमध्ये अडकल्याची कमेंट केली. याशिवाय अनेकांनी हसण्याचा खूपशा इमोजीच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.