वेदनेने विव्हळणाऱ्या बॉयफ्रेंडला घेऊन गर्लफ्रेंड धावत आली, हात असा अडकला की… video व्हायरल
अलीकडेच एक विचित्र घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाल्याने सोशल मीडियावरही जोरात चर्चा सुरू आहे. व्हायरल चॅलेंजचा प्रयत्न करत असताना एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीचा हात तोंडात अडकवला, नक्की काय घडले याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

प्रेयसीचा हात तोंडात अडकल्याने वेदनेने व्हिवळणारा, ओरडत असलेला एक माणूस हॉस्पिटलमध्ये येताच डॉक्टरही प्रचंड चक्रावले होते. एका व्हायरल सोशल मीडिया चॅलेंजमध्ये या दोघांनी भाग घेतल होता, तव्हाच त्या तरूणीचा हात तिच्या प्रियकराच्या तोंडात अडकला होता. सोशल मीडियावरही या अजबगजब घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला, नेटीझन्सनीही त्यावर विविध कमेंट्स केल्या होत्या.
ऑडिटी सेंट्रलच्या वृत्तानुसार, 18 मार्च रोजी चीनच्या जिलिन प्रांतात ही विचित्र घटना घडली, जिथे हे जोडपे ‘हँड ईटिंग’ नावाचे सोशल मीडिया चॅलेंज करत होते. या चॅलेंजमध्ये महिलेने प्रियकराच्या तोंडात मूठ घातली, मात्र तिने हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो निघालाच नाही, उलट त्या मुलाचाया तोंडात अडकून राहिला.
माझा हात मांसाच्या ग्राइंडरमध्ये अडकल्यासारखे वाटत होतं, अशी प्रतिक्रिया त्या तरूणीने दिली. त्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडच्या घशातून गुरगुरण्याचा आवाज आला आणि महिलेच्या मनगटातून तिच्या कोपरापर्यंत लाळ वाहू लागली. दोघांनी हात सोडवण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरल्याने त्या दोघांनी हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली.
अशी केली सुटका
तपासादरम्यान, डॉक्टरांना आढळले की त्या व्यक्तीच्या तोंडाचे स्नायू सुजले होते गेले होते, ज्यामुळे त्या तरूणाचा जबडा लॉक झाला होता. त्याचवेळी दुखण्यामुळे तो महिलेच्या हाताला जोरात चावत होता, त्यामुळे परिस्थिती णखीन बिघडली. रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी घाबरलेल्या त्या तरूणाला शांत करण्यासाठी संगीत सुरू केलं आणि त्याला तोंडाच्या स्नायूंना आराम देण्यासाठी औषध दिले. मग हळूच महिलेचे मनगट फिरवून 20 मिनिटांत दोघांना वेगळे केले.
ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. इंटरनेटवर व्हायरल होणारी आव्हाने मजेशीर वाटत असली तरी ती धोकादायकही ठरू शकतात, असा धडाही यातून मिळतो. म्हणून, कोणत्याही व्हायरल ट्रेंडमध्ये सहभागी होण्यापूर्वी, त्याचे संभाव्य धोके चांगले ओळखले पाहिजेत. कारण, आपलं जीवन अनमोल आहे.