VIDEO | साडी नेसून 80 वर्षीय महिला मॅरेथॉनमध्ये धावली, रस्त्याच्या बाजूला असलेले लोक पाहतच राहिले
सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून लोकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. टाटाकडून मुंबईत मॅरेथॉन ही स्पर्धा जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रविवारी आयोजित केली जाते.
मुंबई : ज्या लोकांना धावायला आवडतं, अशी लोकं प्रत्येकवर्षी मॅरेथॉनमध्ये (Mumbai Marathon) धावताना दिसतात. प्रत्येक वयाची माणसं मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात आणि आपल्या तब्येतीची काळजी सुध्दा घेतात. यावर्षी मुंबईच्या मॅरेथॉन स्पर्धेत 55 हजार लोक सहभागी झाले होते. काही लोकं फक्त समाजिक संदेश देण्यासाठी मुंबईतील मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये तरुण, दिव्यांग आणि वयोवृध्द लोकांचा (Old Lady Running Marathon) देखील समावेश होता. भारती (Grandma, bharati) नावाची एक 80 वर्षीय महिला सुध्दा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होती.
भारती यांची नात डिंपल मेहता फर्नांडिस यांनी मॅरेथॉनमधील एक व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरती शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या नातेवाईकांना आणि परिवारातील लोकांना पाहता यावा म्हणून त्यांनी शेअर केला आहे. भारती या व्हिडीओत राष्ट्रीय ध्वज हातात घेऊन उभ्या आहेत. त्या साडी नेसून मॅरेथॉनमध्ये धावल्या, त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलं आहे. भारती या 51 मिनिटामध्ये चार 4.2 किलोमीटर धावल्या. त्याचबरोबर भारती या मुंबईच्या मॅरेथॉनमध्ये सहाव्यांदा सहभागी झाल्या होत्या.
भारती यांनी दिलेल्या छोट्या मुलाखतीमध्ये भारतात असलेल्या संस्कृतीचा गर्व असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर लोकांना एक चांगला मेसेज देण्यासाठी त्या हातात भारताचा राष्ट्र ध्वज घेऊन धावल्या आहेत. त्याचबरोबर भारतातील तरुण पिढीने धावलं पाहिजे, त्याचबरोबर अधिक व्यायाम सुध्दा केला पाहिजे असा त्यांनी सल्ला दिला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून लोकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. टाटाकडून मुंबईत मॅरेथॉन ही स्पर्धा जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रविवारी आयोजित केली जाते. कोरोनाच्या काळात मागच्या दोन वर्षात त्यामध्ये खंड पडला आहे.