Monkey funny viral video : सोशल मीडिया(Social Media)वर माकडां(Monkey)शी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. त्यांचे काही व्हिडिओ इतके क्यूट आहेत की ते पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात. त्याचबरोबर काही व्हिडिओ मजेशीर (Funny) असतात, तर काही लोकांना पाहून धक्काच बसतो, तर यातील अनेक प्राणीही आपल्याला असे काही धडे देतात, जे पाहून तुम्हालाही जीवनातील एक मोठा धडा मिळेल आणि अति लोभाचे परिणाम वाईट असे का म्हणतात, ते ही कळेल. अनेकदा तुम्ही लहानपणी लोभी माकडाची गोष्ट ऐकली असेल, पण तुम्ही क्वचितच कधी माकडाचा लोभीपणा पाहिला असेल, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हेही समजेल की माकडांमध्येही लोभीपणा असतो. त्यामुळे त्याला उपाशी राहण्याचीही वेळ येते.
सर्व पाव घेतो
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक माकड पाव खात आहे आणि त्याच्या जवळची व्यक्ती त्याला एकामागून एक पाव देत आहे. माकड सुद्धा आपल्या हातातील पंजा समोर करून त्या व्यक्तीच्या हातून पाव घेत आहे. माकडाचे हात पूर्ण भरलेले असतात, पण तरीही त्याचा लोभ संपत नाही आणि तो सुद्धा अनेक पाव आपल्या हातात ठेवायला लागतो. इतर कोणी घेऊ नये म्हणून सर्व पाव सोबत घ्यावे, असे त्याला वाटते. इतकंच नाही तर ती व्यक्ती त्याला केळीही देते आणि ती सगळी केळी घेतो, या प्रकरणामध्ये माकडाच्या हातातून पाव आणि केळीही खाली पडतात. पण माकडाचा लोभ काही संपत नाही. माकडाच्या अशा कृतीमुळे त्याला नीट जेवता येत नाही आणि त्याचे पावही पडतात.
ट्विटरवर शेअर
हा मजेदार व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटवर शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिलंय, की ‘लालच और और पाने के लालच में, जो उसके पास है उस आनंद से भी जाता है. हा व्हिडिओ लिहिपर्यंत या व्हिडिओला शेकडो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत. याशिवाय अनेक यूजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
Good morning ! Aaj ka Gyan..☺️
Greed – लालच?☺️???
और और पाने के लालच में,
जो उसके पास है उस आनंद से भी जाता है@hvgoenka @ipsvijrk pic.twitter.com/Kcq8oKI7Hc
— Rupin Sharma (@rupin1992) February 4, 2022
‘लोभ वाईट आहे’
व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरनं लिहिलं, की या क्लिपनं जीवनाचा एक महत्त्वाचा धडा शिकवला आहे. दुसऱ्या यूझरनं लिहिलं, की लोभ वाईट आहे असं का म्हटलं जातं, हे मला आज समजलं. याशिवाय इतर अनेक यूझर्सनीही यावर कमेंट केल्या आहेत.
Sir gyan lay liya ?
— Kedar Parveen Sharma (@mjparveensharma) February 4, 2022
sir,ये तो आपका प्रेम है कैसे ना ले ?
— Santosh Sagar (@santoshsaagr) February 4, 2022