Viral Video : 6 हजार फुट उंचीवर तरूणाचा रोपवॉक, गिनीज बुकमध्ये नोंद…
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर सगळ्याचंच लक्ष वेधून घेतोय. हा व्हीडिओ पाहून अनेकांजण थक्क झालेत. या व्हीडिओ ब्राझीलमधल्या नागरिकाचा आहे. यात एक व्यक्ती 6 हजार फुटांवरून चालतोय.
मुंबई : सध्या स्टंट (Stunt) तरुणाईला भुरळ घालतंय. तरूणाईत डोक्यात स्टंटबाजीची चांगलीच क्रेझ पाहायला मिळतेय. स्टंटबाजीचे थरारक व्हीडिओ तरूणाईकडून सोशल मीडियावर (Sodial Media) पोस्ट केले जातात. ते खूप वेगाने व्हायरल होतात. हे असे स्टंटचे व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळातात. असाच एक व्हीडिओ सध्या सगळ्याचंच लक्ष वेधून घेतोय. हा व्हीडिओ पाहून अनेकांजण थक्क झालेत. या व्हीडिओ ब्राझीलमधल्या नागरिकाचा आहे. यात एक व्यक्ती 6 हजार फुटांवरून चालतोय. राफेल जुग्नो ब्रिडी (Rafael Zugno Bridi) या व्यक्तीने 6326 फुट उंचीवर चालत वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) आपल्या नावे केलाय.
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर सगळ्याचंच लक्ष वेधून घेतोय. हा व्हीडिओ पाहून अनेकांजण थक्क झालेत. या व्हीडिओ ब्राझीलमधल्या नागरिकाचा आहे. यात एक व्यक्ती 6 हजार फुटांवरून चालतोय. राफेल जुग्नो ब्रिडी या व्यक्तीने 6,326 फुट उंचीवर चालत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केलाय.
View this post on Instagram
राफेल जुग्नो ब्रीदी या व्यक्तीने जमिनीपासून 6326 मीटर उंचीवर चालत विश्वविक्रम रचला आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये राफेल दोन एअर बलूनमध्ये बांधलेल्या स्लॅकलाइनवर चालताना दिसत आहे. त्याच्या या व्हीडिओला अनेकांनी पसंती दिली आहे.
राफेलने ढगांच्याही वरून जात स्लॅकलाइन पार केली. ही उंची जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्याही दुप्पट आहे. सध्या राफेलची कामगिरी पाहून लोकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गिनीज बुककडून शेअर करण्यात आलेल्या राफेलच्या या व्हीडिओला 9 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 78 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेकांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे.
संबंधित बातम्या