हेअर ड्रायरचा वापर करण्याआधी हा शॉकिंग व्हिडिओ पाहा… भीतीने थरकाप उडेल
हा व्हायरल व्हिडिओ बांगला देशमधील असल्याचे समजते. केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जातो. मात्र, याच हेअर ड्रायरचा वापर अत्यंत धोकादायक ठरला आहे. सलूनची अवस्था तर अत्यंत एकदम डेंजर झाली आहे.
नवी दिल्ली : घरात तसेच सलून मध्ये हेअर ड्रायरचा(Hair dryer ) अगदी बिनधास्त आणि सर्रासपणे वापर केला जातो. मात्र, सोशल मीडियावर आता एक असा व्हिडिओ व्हायरल झालाय हा व्हिडिओ पाहून तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करताना दहा वेळा विचार कराल. या व्हिडिओमध्ये हेअर ड्रायरचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हा व्हायरल व्हिडिओ बांगला देशमधील असल्याचे समजते. केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जातो. मात्र, याच हेअर ड्रायरचा वापर अत्यंत धोकादायक ठरला आहे. सलूनची अवस्था तर अत्यंत एकदम डेंजर झाली आहे.
हा व्हायरल व्हिडिओ पाहून हेअर ड्रायरचा वापर करणारे लोक चांगलेच भयभीत झाले आहेत. एका सलूनमधील हा व्हिडिओ आहे. एक व्यक्ती केस कटींग करण्यासाठी सलून मध्ये आला होता. सलूनमध्ये काम करणारा हेअर स्टाईलीस्ट या व्यक्तीचे केस हेअर ड्रायरच्या मदतीने सेट करत होत.
हेअर स्टाईलीस्ट हेअर ड्रायरला इलेक्ट्रिकल बोर्डशी जोडतो आणि बटन ऑन करतो. काही कळण्याच्या आधीच हेअर ड्रायरचा भयानक स्फोट होतो. व्हिडिओमध्ये लोकांच्या किंचाळण्याचा आवाज येत आहे. ग्राहक आणि हेअर स्टाईलीस्ट यांना कितपत दुखापत झाली आहे हे समजू शकले नाही. मात्र, सलूनचे प्रचंड नुकसान झाले आहे.
ही घटना घडली तेव्हा एसीचा गॅस लिक झाला होता. यामुळे हेअर ड्रायरचे कनेक्शन जोडताच ब्लास्ट झाल्याच अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे इलेट्रॉनिक उपकरणांचा वापर करताना सावधानी बाळगणे म्हत्वाचे असल्याचे या व्हिडिओमुळे अधोरेखित झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता अद्याप पटलेली नाही.
View this post on Instagram