मुंबई : पुढच्या काही तासांमध्ये 2020 हे वर्ष कायमचं संपणार आहे. अनेक लोक 2021 या नव्या वर्षाची ताटकळत वाट बघत आहेत (Happy New Year 2021). 2020 हे वर्ष प्रचंड त्रासदायक आणि वेदनादायी ठरलं. त्यामुळे 2021 या नव्या वर्षाकडून लोकांना प्रचंड अपेक्षा आहेत. मात्र, आज तुम्हाला आम्ही एक अशा राज्याबाबत माहिती देणार आहोत जे राज्य 1 जानेवारीपासून नववर्ष साजरी करत नाही. भारतातील एक राज्यच काय जगभरातील काही देशदेखील 1 जानेवारीपासून नवं वर्ष मानत नाही.
संपूर्ण जगभरात सध्या नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची तयारी सुरु आहे. भारतातही मोठी तयारी सुरु आहे. मात्र, भारतातील तामिळनाडू राज्यात जानेवारी महिन्यापासून नव वर्ष साजरी केलं जात नाही. तामिळनाडूचे नागरिक एक जानेवारीला नव वर्षाचा जल्लोष करत नाहीत. तर पोंगल सणाच्या दिवशी नववर्ष मानतात.
तामिळनाडू व्यतिरिक्त जागातील बरेच देश जानेवारीपासून नवं वर्ष मानत नाही. म्यान्मार देशातही जानेवारीपासून नवं वर्ष मानलं जात नाही. म्यान्मारला 13 ते 15 एप्रिल दरम्यान असणाऱ्या तिजान सणात नव वर्ष साजरी करतात (Happy New Year 2021).
जपानमध्ये 5 जानेवारीला नव वर्ष
इराणचे लोक नैरोजच्या वेळी नव वर्ष साजरी करतात. नैरोज सण दरवर्षी मार्च महिन्यात येतो. थायलंडमध्येही नव वर्ष एक जानेवारीपासून साजरी केलं जात नाही. येथील लोक 12 ते 15 एप्रिल दरम्यान नव वर्ष साजरी करतात. या व्यतिरिक्त जपानमध्येही 1 जानेवारीपासून नववर्ष साजरी केलं जात नाही. इथे 5 जानेवारीपासून नव वर्ष साजरी करतात.