Happy New Year 2023 : नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना या राज्यातील मद्यशौकीन 9 कोटी रुपयांची दारू प्यायले
या राज्यातील मद्यशौकीनांचा अनोखा रेकॉर्ड, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 9 कोटी रुपयांची दारु प्यायले
नोएडा : नवीन वर्षात (Happy New Year 2023) चांगले उपक्रम करण्याचा अनेकांचा मानस असतो. जुन्या वर्षात झालेल्या गोष्टी विसरुन अनेकजण नवीन प्लॅन (New Plan) करीत असतात. विशेष म्हणजे मागच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी जगभरात पार्टी केली जाते. त्याचबरोबर नवं वर्षाचं स्वागत केलं जातं. नोएडामधील (Noida) मद्यशौकीनांनी एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी तब्बल 9 कोटी रुपयांची दारु प्यायली असल्याचं उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलं आहे. त्यामुळे सगळीकडे याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला मोठा फायदा सुध्दा झाला आहे.
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमधील लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मद्यपान केले होते. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्यपान केले की, यापुर्वीचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 23 अधिक मद्यपान झाली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला चांगलाचं फायदा झाला आहे. लोकांनी 9 कोटी रुपयांची दारु प्यायली, त्यामध्ये देशी विदेशी दारू आणि बिअरचा समावेश आहे.
गौतम बुद्ध नगरमधील लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तब्बल दोन लाख तीस हजार लिटर दारु प्यायले. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यामध्ये त्यांना 2512 लिटर दारु जप्त केली आहे.
गौतम बुद्ध नगरमध्ये डिसेंबर महिन्यात 139.6 करोड रुपयांची दारु विक्री झाली आहे. युपीच्या लोकांनी दारु पिण्यामध्ये रेकॉर्ड केल्यामुळे त्यांची सोशल मीडियावर सुध्दा अधिक चर्चा आहे.विशेष म्हणजे मागच्या तीन वर्षात कोरोना असल्यामुळे लोकांना नवीन वर्षाचं स्वागत करता आलं नव्हतं.