अरविंद केजरीवाल हार्दिक पटेल यांच्या घरासमोर हात जोडून उभे!, राजिनाम्यानंतर मीम्सचा पूर
हार्दिक पटेल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. या सगळ्यानंतर आता लोकांच्या क्रिएटिव्हिटीला उधाण आलं आहे. हार्दिक यांच्या राजिनाम्यावर मीम्स् बनवले जात आहेत. यात राहुल गांधींपासून अरविंद केजरीवाल दिसत आहे.
मुंबई : गुजरात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच काँग्रेसला (congress) मोठा धक्का देत हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देतानाच त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. हार्दिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राजीनाम्याची घोषणा केली आहे. तसेच काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. हार्दिक गेल्या काही महिन्यांपासून पक्षात नाराज झाले होते. मधल्या काळात तर त्यांनी भाजपची (bjp) स्तुती केली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिवाय हार्दिक पटेल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची जोरदार चर्चा होती. आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. या सगळ्यानंतर आता लोकांच्या क्रिएटिव्हिटीला उधाण आलं आहे. हार्दिक यांच्या राजिनाम्यावर मीम्स् बनवले जात आहेत. यात राहुल गांधींपासून अरविंद केजरीवाल दिसत आहे.
राजीनाम्यानंतर मीम्सचा पूर
हार्दिक पटेल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. या सगळ्यानंतर आता लोकांच्या क्रिएटिव्हिटीला उधाण आलं आहे. हार्दिक यांच्या राजिनाम्यावर मीम्स् बनवले जात आहेत. यात राहुल गांधींपासून अरविंद केजरीवाल दिसत आहे.
केजरीवाल पटेलांच्या दारी!
मीम सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषय आहेत. काही घडलं की लोक मीम्सच्या माध्यमातून त्यावर भाष्य करतात. आता हार्दिक यांच्या राजीनाम्यानंतरही काही हटके मीम्स बनवण्यात आले आहेत. यातलं एक मीम तर प्रचंड बोलकं आहे. हार्दिक आपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर हे मीम भाष्य करतं. या मीममध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हात जोडून उभे असल्याचं दिसत आहे. अन् ते विचारत आहेत की “काय मी घरात येऊ शकतो?”
Hardik Patel leaves Congress Party,
Meanwhile a Guy outside his house : pic.twitter.com/s6MWDbgehj
— g0v!ñD $#@®mA (@rishu_1809) May 18, 2022
आणखी एक मीम बनवण्यात आलंय. यात राहुल गांधी दिसत आहेत. राजीनाम्याची बातमी बघून ते म्हणत आहेत की, “तुम्ही हे चांगलं करत नाही आहात. ”
Gujarat | Hardik Patel resigns from Congress membership. pic.twitter.com/DEYZDoiFDB
— ANI (@ANI) May 18, 2022
एका नेटकऱ्याने मांजरीचा लॉपटॉपवर काम करतानाचं GFX शेअर केलंय. यावर आता हीच ती वेळ जुने ट्विट डिलीट करण्याची असं लिहिलंय.
Time to delete old tweets against Harpic: pic.twitter.com/DJZ9DKw2x9
— Tarun ཊརུན (@YearOfMonk) May 18, 2022
चिंतन शिविर के रुझान आने शुरू ???
— Prabal? (@RationalPrabal) May 18, 2022
हार्दिक पटेल गुजरातमधला तगडा युवा चेहरा आहे. त्यांच्या पाठिशी तरूण मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रात जसं मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केलं. तसं गुजरातमध्ये पाटीदार समाजाने आरक्षणासाठी मोठं आंदोलन केलं. त्या आंदोलनात हार्दिकन सहभागी झाला होता. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. हार्दिक तरूणांच्या प्रश्नांसाठी मोठ्या झगडताना दिसतो. हार्दिकने काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा गुजराती तरूण काँग्रेसकडे आकर्षित झाला. पण त्यांचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर असा काँग्रेसला रामराम ठोकणं, काँग्रेसला परवडणारं नाही. हार्दिक यांच्या या निर्णयाने गुजरातमधला मोठा तरूण वर्ग काँग्रेसपासून दुरावू शकतो. पण पुढे तो कोणता निर्णय घेतात. हे पाहणं महत्वाचं असेल.